इमरान खान पाकिस्तानातून भारतात येणार, मनसेचा खळखट्याकचा इशारा! वातावरण तापले
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. अशात पाकिस्तानी गायक इमरान खान 24 डिसेंबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याला मनसेना विरोधा केला आहे.

पुलावामा हल्ला झाल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली. भारतात प्रदर्शित होणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांच्या सिनेमांना मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला. आता पाकिस्तानी गायक मुंबईत येणार असल्याचे कळताच मनसेने विरोध केला आहे. मनसे नेते कुशल धुरी यांनी थेट धमकी दिली आहे. आता नेमकं काय प्रकरण आहे? वाचा…
पाकिस्तान प्रीमियर लीगचा गायक इमरान खान 24 डिसेंबर रोजी भारतात दौऱ्यावर येणार आहे. त्यापूर्वी मनसे नेता कुशल धुरी यांनी पाकिस्तानी गायक इम्रान खानच्या कार्यक्रमाला मोठा विरोध केला आहे. तसेच त्याला धमकी देखील दिली आहे. त्यामुळे आता 24 डिसेंबरचा इमरान खानचा दौरा रद्द होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसे नेते काय म्हणाले?
कुशल धुरी याविषयी बोलताना म्हणाले की, “24 तारखेला मुंबईमध्ये पाकिस्तानी सिंगर इमरान खान परफॉर्म करणार आहे. पुलवामा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंदूर केलं त्याच्यानंतर अनेक पाकिस्तानी गतविधी थांबले आहेत. याच्यामध्ये काहीतरी कारवाई झाली पाहिजे. अमेय खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे नक्की आहे की याला इथे येऊन देणारच नाही. स्किल बॉक्सला आम्ही ऑन स्किल बॉक्स करून दाखवू करून दाखव ही आमची भूमिका असणार आहे.”
सिनेमालाही झाला होता विरोध
एप्रिल महिन्यात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर यांचा अबीर गुलाल हा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार होता. मात्र, या चित्रपटाविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली. चित्रपटात पाकिस्तानी कलाकाराची भूमिका असल्यामुळे मनसेकडून विरोध करण्यात आला. पाकिस्तानी चित्रपट आणि पाकिस्तानी कलाकारांना आम्ही महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करण्याचा विचार बदलावा. आम्ही याठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकाराला घेऊन चित्रपट बनवण्याची आपल्याला गरज काय आहे? अशी भूमिका मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मांडली होती. आता गायक इमरान खानच्या मुंबई दौऱ्यावर त्यांची काय प्रतिक्रिया असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
