कल्याणमध्ये सीएचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या, दुर्घटना की घातपात, तपास सुरु

| Updated on: Oct 17, 2020 | 4:15 PM

सागर यांनी आत्महत्या केली आहे, की त्यांच्यासोबत घातपात झाला आहे. याचा तपास रेल्वे पोलीस करीत आहेत

कल्याणमध्ये सीएचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या, दुर्घटना की घातपात, तपास सुरु
Follow us on

कल्याण : मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत तपास सुरु असताना एका मोठ्या कंपनीच्या सीएचा मृतदेह (Kalyan CA Suspicious Death) टिटवाळाजवळ रेल्वे रुळाजवळ मिळून आल्याने एकच खळबळ उडाली. सागर देशपांडे असे या सीएचे नाव असून ते 11 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. सागर यांनी आत्महत्या केली आहे, की त्यांच्यासोबत घातपात झाला आहे. याचा तपास रेल्वे पोलीस करीत आहेत (Kalyan CA Suspicious Death).

कल्याणजवळच्या टिटवाळ्यात 12 ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रेल्वे रुळाच्या बाजूला आढळून आला होता. कल्याण रेल्वे पोलिसांनी एडीआर दाखल करत पुढील तपास सुरु केला. सदर मृतदेहाची ओळख पटण्यासाठी त्याचे फोटो राज्यभरात पाठविण्यात आले. अखेर आज त्या व्यक्तीची ओळख पटली. हा व्यक्ती 11 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. ठाण्यातील नवापाडा पोलीस ठाण्यात या व्यक्तीची मिसिंगची रिपोर्ट दाखल आहे. नातेवाईक सहा दिवसापासून त्याचा शोध घेत होते. सागर सुहास देशपांडे असे या व्यक्तीचे नाव आहे. सागर हे एका मोठ्या कंपनीत सीए होते.

या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाल्मिक शार्दूल यांनी सांगितले की, 12 तारखेला सागरचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळून आला होता. त्या ठिकाणापासून त्यांची व्हॅगनर कार दीड किलोमीटर दूर एका निजर्न स्थळी सापडली. 11 ऑक्टोबर रोजी आपल्या घरच्या लोकांना मी टिटवाळा येथे जात आहे असे सांगून घराबाहेर पडले होते. ते पुन्हा घरी आलेच नाही. सागर देशपांडे यांची एका प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेत चौकशी सुरु आहे (Kalyan CA Suspicious Death).

मात्र, आम्ही आत्ता हा तपास सुरु केला आहे की, सागर यांनी स्वत: आत्महत्या केली आहे. त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे की, त्यांच्यासोबत घातपात झाला आहे, या तिन्ही अंगाने पोलिस तपास सुरु आहे. या प्रकरणी सागर यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता ते सध्या ते काही बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगून आम्ही काही वेळानंतर बोलू, असे सांगितले आहे. मात्र, एक सीए ज्याची पोलिसांकडे तपास सुरु आहे. त्याचा असा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Kalyan CA Suspicious Death

संबंधित बातम्या :

एटीएमच्या माध्यमातून 412 कोटींच्या फसवणुकीचा प्रयत्न; पोलिसांकडून रॅकेट उद्ध्वस्त, दोघांना अटक

धक्कादायक..दारुड्या मुलानं केला वडिलांचा खून, अमरावतीमधील घटना