आठवडाभरात कोल्हापूरचा दुसरा जवान शहीद, निगवेचे संग्राम पाटील धारातीर्थी

| Updated on: Nov 21, 2020 | 11:50 AM

भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत असलेले निगवे खालसा गावातील संग्राम पाटील पाकच्या हल्ल्यात शहीद झाले

आठवडाभरात कोल्हापूरचा दुसरा जवान शहीद, निगवेचे संग्राम पाटील धारातीर्थी
Follow us on

कोल्हापूर : पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झाला. जम्मू काश्मीरमधील राजोरी भागात 16 मराठा पोस्टवर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात निगवे खालसा येथील संग्राम पाटील (Sangram Patil) यांना वीरमरण आलं. गेल्याच आठवड्यात जवान ऋषिकेश जोंधळे (Rishikesh Jondhale) शहीद झाले होते. (Kolhapur Nigwe Sangram Patil Martyr in Pak Attack)

संग्राम पाटील हे भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत होते. निगवे खालसा गावासह परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. शहीद जवान हवालदार संग्राम पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या जवानाला वीरमरण आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांनी देशाच्या रक्षणासाठी अवघ्या 20 व्या वर्षी आपल्या प्राणांची बाजी लावली. पाकिस्तानने 13 नोव्हेंबरला शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारताच्या दिशेला बेछूट गोळीबार केला होता. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, या गोळीबारात महाराष्ट्राने आपला वीरपुत्र गमावला.

अवघ्या 20 व्या वर्षी वीरमरण

ऋषिकेश जोंधळे दोन वर्षांपूर्वी बेळगावमध्ये सैन्यात भरती झाले होते. ते भरती झाल्यापासून जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत होते. जोंधळे पुँछ जिल्ह्याच्या सवजियान येथे सीमा भागात तैनात होते. पाक सैन्याकडून 13 नोव्हेंबरला पहाटेपासून वारंवार शस्त्रीसंधीचं उल्लंघन केलं जात होतं. पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला उत्तर देताना ऋषिकेश गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराठी हेलिकॉप्टरमधून सैन्याच्या दवाखान्यात नेत असताना त्यांचं निधन झालं.

(Kolhapur Nigwe Sangram Patil Martyr in Pak Attack)

पाकिस्तानकडून सीमाभागात वारंवार गोळीबार सुरु होता. भारतीय जवानांनीदेखील त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, या गोळीबारात अवघ्या 20 वर्षांचे महाराष्ट्राचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे शहीद झाले. जोंधळे शहीद झाल्याची बातमी बहिरेवाडीच्या गावकऱ्यांना संध्याकाळी समजली. त्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.


संबंधित बातम्या – 

Kolhapur | कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण, कुटुंबावर शोककळा

Kolhapur | भारत-पाकमध्ये धुमश्चक्री, कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण

(Kolhapur Nigwe Sangram Patil Martyr in Pak Attack)