कोरेगाव भीमा विजय दिन, सभा घेण्यासाठी दलित संघटनांची चढाओढ

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

पुणे : कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी दलित समाज बांधव जमले असताना या कार्यक्रमाला गालबोट लागलं आणि काही हिंसक घटना घडल्या. या घटनांची सुरुवात पुण्याजवळच्या कोरेगाव भीमा, पाबळ आणि शिक्रापूर इथून झाली. मात्र त्याची पुनरावृत्ती परत होऊ नये यासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. विजय दिवस काही दिवसांवर आला आहे. सर्वत्र एकोपा होत […]

कोरेगाव भीमा विजय दिन, सभा घेण्यासाठी दलित संघटनांची चढाओढ
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

पुणे : कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी दलित समाज बांधव जमले असताना या कार्यक्रमाला गालबोट लागलं आणि काही हिंसक घटना घडल्या. या घटनांची सुरुवात पुण्याजवळच्या कोरेगाव भीमा, पाबळ आणि शिक्रापूर इथून झाली. मात्र त्याची पुनरावृत्ती परत होऊ नये यासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. विजय दिवस काही दिवसांवर आला आहे. सर्वत्र एकोपा होत असताना दलित संघटना भाषण करू द्यावं यासाठी चढाओढ करत आहेत.

1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिकांदरम्यान झालेल्या युद्धाला 200 वर्ष पूर्ण झाली. ब्रिटिशांच्या विजयाचा जल्लोष दलित समाज साजरा करतो. कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर महार समाजाचे सैनिक होते. त्या काळी महार समाजातील लोकांना अस्पृश्य मानण्यात येत होतं. हे युद्ध कोरेगावची लढाई या नावाने प्रसिद्ध आहे.

आक्रमणादरम्यान त्यांच्यासमोर ब्रिटिश सैन्याची कुमक असलेली तुकडी उभी ठाकली. या तुकडीत 800 सैनिकांचा समावेश होता. पेशव्यांनी कोरेगावस्थित ईस्ट इंडिया कंपनीवर आक्रमणासाठी 2000 सैनिकांचा समावेश असलेली फौज पाठवली होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीत भारतीय वंशाचे काही सैनिक होते. यापैकी बहुतांश महार समाजाचे होते. हे सर्व जण बॉम्बे नेटिव्ह इन्फॅन्ट्री विभागाशी संलग्न होते. म्हणूनच ही घटना दलित चळवळीच्या इतिहासातला महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं दलित कार्यकर्ते मानतात. म्हणून सर्वजण इथे 1 जानेवारीला येतात असं आलेले भीमसैनिक सांगतात.

विजय दिनासाठी लोकांची मोठी गर्दी असते. यावर्षी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली आहे. याबाबत अनेक बैठकाही झाल्या आहेत. यावर्षी अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली आहे, अशी महिती समिती अध्यक्ष यांनी दिली. सीसीटीव्ही आणि ड्रोन खबरदारीसाठी असणार आहे. यावर्षी सर्वांनी शांततेत यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

गेल्या वर्षीची जी घटना घडली, ती बाहेरच्या आलेल्या लोकांमुळे झाली, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. गावातील एकोपा एक आहे तो यापुढेही राहील. चुकीचा इतिहास सांगून असं कृत्य केलं. गावागावात बैठका झाल्या आहेत. मागच्या वर्षी जे झाले ते बाहेरच्या लोकांमुळे झालं. यावर्षी काही होणार नाही याची खबरदारी गावकरी घेत आहेत. तर राजकीय पक्षांनी श्रेय घेण्यासाठी जनतेला वेठीस धरू नये, जो एकोपा आहे तो टिकून राहावा. सभा घेण्यासाठी प्रयत्न सर्व संघटनांचे सुरू आहेत. मात्र सभा घेऊन वातावरण खराब होईल, असं गावकरी सांगतात.