कूलरसाठी व्हेटिंलेटरचा प्लग काढला, रुग्णाचा मृत्यू

राजस्थानच्या कोटामध्ये शासकीय रुग्णालयात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीचा मृत्यू व्हेंटिलेटरचा प्लग काढल्याने झाला.

कूलरसाठी व्हेटिंलेटरचा प्लग काढला, रुग्णाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 20, 2020 | 5:10 PM

जयपूर : राजस्थानच्या कोटामध्ये शासकीय रुग्णालयात 40 वर्षीय (Unplugged Ventilator) व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीचा मृत्यू व्हेंटिलेटरचा प्लग काढल्याने झाल्याचा आरोप होत आहे. या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याने कूलर सुरु करण्यासाठी चुकीने व्हेंटिलेटरचा प्लग काढल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने तीन सदस्यीय समितीची स्थापना केली. ही समिती या प्रकरणाचा (Unplugged Ventilator) तपास करेल.

या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता. त्यामुळे 13 जूनला त्याला कोटा येथील (Kota Government Hospital) महाराव भीम सिंह रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला.

गरम होतं म्हणून कुटुंबाने कूलर आणला

या व्यक्तीला सुरुवातीला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. मात्र, अतिदक्षता विभागात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे 15 जूनला या व्यक्तीला विलगीकरण वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. विलगीकरण कक्षात खूप उकडत होतं, त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्यासाठी कूलर खेरदी करुन आणला.

मात्र, विलगीकरण वॉर्डात कूलर चालवण्यासाठी कूठलाही प्लग त्यांना सापडला नाही. त्यामुळे त्यांनी व्हेंटिलेटरचा प्लग काढला, असा आरोप आहे. प्लग काढल्यानंतर अर्ध्या तासाने व्हेंटिलेटरचा पॉवर संपला आणि त्यानंतर या रुग्णाची तब्येत खालावली. तात्काळ डॉक्टर आणि नर्सला बोलावण्यात आलं. मात्र, तोपर्यंत या व्यक्तीचा मृत्यू झालेला होता (Unplugged Ventilator).

तपासासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन

रुग्णालयातील तीन सदस्यीय समितीमधील उपअधीक्षक, परिचारीका अधीक्षक आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी हे या प्रकरणाचा तपास करतील, असं रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नवीन सक्सेना यांनी सांगितलं. शनिवारी रात्रीपर्यंत त्यांना त्यांचा अहवाल सादर करायचा आहे. विलगीकरण कक्षातील मेडिकल स्टाफचा जबाब नोंदवण्यात आला आहे. मात्र, मृतकाच्या कुटुंबातील लोक कुठल्याही प्रकारचा सहकार्य करत नाही, असंही डॉ. नवीन सक्सेना यांनी सांगितलं.

कुटुंबाचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन

याप्रकरणी जो कोणी दोषी असेल त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं. तर, मृतकाच्या कुटुंबाला कूलर चालवण्याची परवानगी दिली नाही, असंही रुग्णालय प्रशासनाने सांगतिलं. त्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केलं (Unplugged Ventilator).

संबंधित बातम्या :

Nashik Corona | नाशकात सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल, पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच थांबण्याचा सल्ला

होम आयोलेशनमुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक, केंद्राकडून राज्यांना पत्र, होम क्वारंटाईनचे नवे आदेश जारी

खारघरमध्ये लहानग्यांच्या शाळेत कैद्यांची ‘भरती’, 200 कैदी विलगीकरणात, 11 पोलिसांवर जबाबदारी

Non Stop LIVE Update
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....