कृष्णा नदी 32 फुटांवर, पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल, सांगली-कोल्हापुरात पुन्हा पूरस्थिती

| Updated on: Sep 09, 2019 | 9:42 AM

सांगलीत आयुर्विन पुलाजवळ कृष्णा नदीच्या (krishna river) पाण्याची पातळी 32 फूट 5 इंचावर गेली आहे.

कृष्णा नदी 32 फुटांवर, पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल, सांगली-कोल्हापुरात पुन्हा पूरस्थिती
Follow us on

सांगली : कोल्हापूर आणि सांगली (Kolhapur sangli flood) जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरसह सांगलीकरांची (Sangli flood) धास्ती पुन्हा एकदा वाढली आहे. गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर सांगलीत पावसाने (Sangli flood) धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सांगलीत आयुर्विन पुलाजवळ कृष्णा नदीच्या (krishna river) पाण्याची पातळी 32 फूट 5 इंचावर गेली आहे. खबरदारी म्हणून सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आणि दत्तनगर या परिसरातील काही नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची (Panchaganga river flood) धोका पातळीकडे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे कोल्हापुरला पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कोल्हापुरातील 68 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच करवीर तालुका आणि शिरोळ तालुक्यातील कुठूम्ब या ठिकाणच्या अनेकांना स्थलांतरित करण्यात येत आहे.

सांगलीतील नागरिकांचे स्थालांतर

गेल्या काही दिवसांपासून सांगलीत मुसळधार पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आहे. दरम्यान कृष्णा नदीच्या पाणी पातळी 30 फुटांवर गेल्याने शहरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आणि मगरमच्छ कॉलनी या परिसरात पाणी शिरले आहे.

कोल्हापुरातील 68 बंधारे पाण्याखाली, पंचगंगेची पातळी 39 फुटांवर

कोल्हापुरातही गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 335.57 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 68 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर पंचगंगेची धोका पातळी 43 फूट असून सद्यस्थितीत पाणी पातळी 39 फूट 9 इंचापर्यंत पोहोचली आहे. तसेच राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग अद्याप सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर काही कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान सद्यस्थितीत कोकणाकडे जाणारा कोल्हापूर गगनबावडा मार्ग सुरु आहे.

कोल्हापुरातील धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग 

  1. राधानगरी धरण – विसर्ग 4256 क्यूसेक
  2. तुळसी धरण – विसर्ग – 1011 क्यूसेक
  3.  कुंभी धरण- विसर्ग-950 क्यूसेक
  4. कासारी धरण – विसर्ग-1100 क्यूसेक
  5. दुधगंगा – विसर्ग- 5400 क्यूसेक

सांगलीतील आयर्विन पुलाजवळ इशारा पातळी 40 फूट, तर धोका पातळी 45 फूट आहे. पाणी नदी पात्रामध्येच राहणार असले, तरी नदीकाठच्या विशेषत: वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील आणि महानगरपालिका क्षेत्रातील लोकांना सावधानता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात जावू नये, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यापूर्वी दिल्या आहेत.

कोल्हापूर-सांगली महापूर

गेल्या महिन्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला होता. दोन्ही जिल्ह्यातील अनेक तालुके जवळपास दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस पाण्याखाली होती. दोन्ही जिल्ह्यातील लाखो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं. शेकडो माणसं आणि हजारो जनावरांचा मृत्यू झाला. महापुरामुळे पुणे-बंगळुरु महामार्ग बंद झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा जाणवत होता.

त्यानंतर अनेक दिग्गजांनी कोल्हापूर सांगलीतील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला होता. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून काही रक्कमही पूरग्रस्तांना दिली होती.