जमीन व्यवहाराचा पिंपरी पॅटर्न, मंत्रालयापर्यंत धागेदोरे?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

पुणे: गुंडांचा वापर करुन जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहाराशी निगडित, गुन्हेगारीवर बेतलेला “मुळशी पॅटर्न”चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. मात्र पिंपरी चिंचवडमधील एका महाभागाने गुंडांऐवजी चक्क मंत्रालयातील ओळख दाखवत,जमीन आणि करोडो रुपये हडप केल्याचं समोर आलं आहे. जमिनी खरेदी विक्रीच्या गैरव्यहाराचा हा “पिंपरी पॅटर्न” नेमका काय आहे? राजशेखरन पिल्ले हा पिंपरी चिंचवडमधील मकरज्योती चिटफंड कंपनीचा मालक सध्या पुण्याच्या […]

जमीन व्यवहाराचा पिंपरी पॅटर्न, मंत्रालयापर्यंत धागेदोरे?
Follow us on

पुणे: गुंडांचा वापर करुन जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहाराशी निगडित, गुन्हेगारीवर बेतलेला “मुळशी पॅटर्न”चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. मात्र पिंपरी चिंचवडमधील एका महाभागाने गुंडांऐवजी चक्क मंत्रालयातील ओळख दाखवत,जमीन आणि करोडो रुपये हडप केल्याचं समोर आलं आहे. जमिनी खरेदी विक्रीच्या गैरव्यहाराचा हा “पिंपरी पॅटर्न” नेमका काय आहे?

राजशेखरन पिल्ले हा पिंपरी चिंचवडमधील मकरज्योती चिटफंड कंपनीचा मालक सध्या पुण्याच्या येरवडा जेलमध्ये कैद आहे. कारण  दिग्गज मंत्री आपले मित्र असल्याचं भासवत, या पठ्ठयाने, 5 एकर शेतजमिनीचं रुपांतर बिगर शेतजमीन (NON AGRAICULTURE) मध्ये करुन देण्याच्या नावाखाली, त्याच्याच ओळखीतील रवींद्रम पिल्लेकडून चक्क 2 कोटी रुपये आणि त्याची 1 एकर जमीन घेतली. मात्र जेव्हा काम होत नाही हे रवींद्रमच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी आरोपी पिल्लेकडे आपले पैसे परत मागितले, तेव्हा त्याने पलटी मारली. तू मला पैसेच दिले नाहीत, असं तो म्हणाला.

आरोपी पिल्लेचा असा अवतार पाहून, आपली फसवूण झाल्याचं रवींद्रमच्या लक्षात आल्याने, त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि तब्बल 2 वर्ष तपास करुन, पिंपरी पोलिसांनी अखेर 15 नोव्हेंबरला राजशेखरनच्या मुसक्या आवळल्या.मात्र आजी-माजी मंत्र्याच्या नावाचा वापर करून केल्या गेलेला हा  फसवणुकीच प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं सांगत याची सखोल चौकशी करण्याची मागणी  वकिलांनी केली आहे.

मंत्र्याचं नाव वापरुन आणि त्यांची बनावट कागदपत्रे तयार करुन, सामान्यांची अशी फसवणूक करणारा राजशेखरन एकटा नसून त्याच्यामागे नक्कीच कुणीतरी  बडी आसामी असावी हे स्पष्टच आहे, त्यामुळे रवींद्रमना न्याय देत, पोलीस त्या बड्या आसामीच्या मुसक्या आवळू शकले,तरच जमिनीच्या खरेदी विक्रीचा हा फसवा “पिंपरी पॅटर्न”ला अघोषित राजमान्यता मिळण्यापासून वाचेल असं म्हटलं तर वावग ठरणार नाही