सर्वात स्वस्त गृहकर्ज कोठे मिळणार? जाणून घ्या तपशील
आज आम्ही तुम्हाला अशा संस्थेबद्दल सांगणार आहोत जी आपल्या ग्राहकांना सर्वात कमी व्याजदराने गृहकर्ज देत आहे. चला तर मग जाणून घ्या.

तुम्ही होमलोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी आधी वाचा. वर्ष 2025 मधला शेवटचा महिना, डिसेंबर आता अवघ्या काही दिवसातच संपणार आहे. त्यानंतर 2026 हे नवे वर्ष सुरू होणार आहे. जर तुम्ही येत्या नवीन वर्षात गृहकर्ज घेऊन स्वतःचे घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर प्रथम तुम्हाला वेगवेगळ्या बँका आणि NBFC च्या व्याजदरांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे, त्यानंतर तुम्ही ज्या बँकेचे व्याज दर कमी आहेत अशा बँकेकडून गृहकर्ज घेतले पाहिजे.
व्याजदरातील 1 टक्का फरक देखील तुम्हाला लाखो रुपये वाचवू शकतो कारण गृहकर्ज हे एक मोठे आणि दीर्घकालीन कर्ज आहे. आज आम्ही तुम्हाला अशा संस्थेबद्दल सांगणार आहोत जी आपल्या ग्राहकांना सर्वात कमी व्याजदराने गृहकर्ज देत आहे. आम्ही LIC हाऊसिंग फायनान्सबद्दल बोलत आहोत.
LIC हाऊसिंग फायनान्स होम लोन
LIC हाऊसिंग फायनान्स सध्या आपल्या ग्राहकांना अत्यंत कमी व्याजदराने गृहकर्ज देत आहे. LIC हाऊसिंग फायनान्सच्या गृहकर्जाचे सुरुवातीचे व्याजदर 7.15 टक्के आहेत. चांगला क्रेडिट स्कोअर असेल तर तुम्ही LIC हाऊसिंग फायनान्स होम लोनमधून केवळ 7.15 टक्के व्याजदराने 5 कोटी रुपयांपर्यंतचे होम लोन घेऊ शकता. क्रेडिट स्कोअर कमी असल्यास व्याज दर जास्त असू शकतात LIC हाऊसिंग फायनान्स होम लोनचे व्याज दर ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअरनुसार भिन्न असतात. हे व्याजदर खालीलप्रमाणे आहेत.
व्याज दर ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअरनुसार
- 825 पेक्षा जास्त – 7.15 टक्के
- 800 ते 824 – 7.25 टक्के
- 775 ते 799 – 7.35 टक्के
- 750 ते 774 – 7.45 टक्के
- 725 ते 749 – 6.65 टक्के
- 700 ते 724 – 7.95 टक्के
- 600 ते 699 – 8.75 टक्के
- 600 ते 9.55 टक्के
तुमच्या क्रेडिट स्कोअरच्या आधारे एलआयसी हाऊसिंग फायनान्स तुम्हाला कर्ज देते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्ही जास्त रकमेचे कर्ज घेऊ शकता. दुसरीकडे, जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर तुम्हाला कमी रकमेचे कर्ज मिळेल. क्रेडिट स्कोअरनुसार कर्जाची रक्कम अशी असते.
क्रेडिट स्कोअरनुसार कर्जाची रक्कम
- 825 – 5 कोटी पेक्षा जास्त
- 800 ते 824 – 5 कोटी
- 775 ते 799-50 लाख रुपये
- 750 ते 774 लाख रुपये
- 725 ते 749 लाख रुपये
- 700 ते 724 लाख रुपये
- 600 ते 699 – 35 लाख
- 600 ते 35 लाखांच्या खाली
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
