AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mrunal Thakur: मृणालने अखेर लग्नाबद्दल मौन सोडलंच; म्हणाली, ‘नक्की जेवून जा…’

Mrunal Thakur: अभिनेत्री मृणाल ठाकूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मृणाल अभिनेता धनुष याच्यासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांना जोर धरलेला असताना, अभिनेत्रीच्या एका वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Mrunal Thakur: मृणालने अखेर लग्नाबद्दल मौन सोडलंच; म्हणाली, 'नक्की जेवून जा...'
Mrunal Thakur and Dhanush AI Image
| Updated on: Feb 13, 2026 | 12:36 PM
Share

Mrunal Thakur: अभिनेत्री मृणार ठाकून हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. मालिका त्यानंतर मोठ्या पडद्यावर अनेक भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता मृणाल तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मृणार ठाकूर हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून मृणार ठाकूर हिच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. मृणाल, अभिनेता धनुष याच्यासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. असं देखील म्हटलं जात आहे की, 14 फेब्रुवारी रोजी धनुष आणि मृणाल गुपचूप लग्न करणार आहे.

अशात नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत मृणाल म्हणाली, ‘फक्त दिखाव्यासाठी कधीच लग्न करु नये… जेव्हा योग्य वेळ येईल… जेव्हा तुम्हाला योग्य जोडीदार मिळेल… एक अशी व्यक्ती जिच्यावर तुम्ही विश्वास ठेऊ शकाल… ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला चांगलं वाटेल… अशी व्यक्ती जी गप्प बसल्यानंतर देखील तुम्हाला त्रास होणार नाही… तेव्हा तुम्ही लग्न केलं पाहिजे…’

एवढंच नाही तर, शनिवारी तुझं लग्न होणार आहे… असं विचारल्यानंतर अभिनेत्री हसत म्हणाली, ‘आज माझी हळद आहे.. उद्या संगीत… आणि जेवून नक्की जा…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सांगायचं झालं तर, मृणाल सध्या आगामी ‘दो दीवाने शहर में’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमात मृणाल हिच्यासोबत अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र मृणाल हिची चर्चा सुरु आहे . सिनेमा 20 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

सांगायचं झालं तर, लग्नाबद्दल पसरलेल्या अफवांवर मृणाल म्हणालेली, ‘अफवा ऐकल्यानंतर मला हसायला येतं… कारण मला स्वतःला माहिती नाही की, माझं लग्न कधी आहे… मी सांगतेय, जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा मी सर्वांना माझ्या लग्नाबद्दल सांगेल… मला प्रेमाचा अनुभव आवडतो… ‘, असं देखील मृणाल ठाकूर म्हणालेली.

मृणाल हिच्या  खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, मृणाल आणि धनुष यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.