Baramati By-Elections | बारामती-राहुरी पोटनिवडणूक: सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार रिंगणात; काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी आज पोटनिवडणुकीचे मतदान पार पडत आहे. बारामतीसह राहुरी मतदारसंघातही मतदान प्रक्रिया सुरू असून, मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह एकूण 23 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सकाळी 9 वाजेपर्यंत बारामतीत सुमारे 8.1 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी आज पोटनिवडणुकीचे मतदान पार पडत आहे. बारामतीसह राहुरी मतदारसंघातही मतदान प्रक्रिया सुरू असून, मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह एकूण 23 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सकाळी 9 वाजेपर्यंत बारामतीत सुमारे 8.1 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळत असून, दिवसभरात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी स्वतः मतदानाचा हक्क बजावला असून, पार्थ पवार यांनीही मतदान केलं आहे. काटेवाडी येथे पवार कुटुंबीयांनी मतदान करत लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला. खासदार सुप्रिया सुळे, त्यांची मुलगी रेवती सुळे तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनीही मतदान केलं. तसेच आमदार रोहित पवार यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. या पोटनिवडणुकीकडे राज्यभराचं लक्ष लागलं असून, निकालाबाबत उत्सुकता वाढत चालली आहे.
Published on: Apr 23, 2026 01:11 PM
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा

