AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat Case Update | लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड टाकून...

Ashok Kharat Case Update | लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड टाकून…

| Updated on: Apr 23, 2026 | 1:43 PM
Share

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन घडामोडी समोर येत असून तपास अधिकच गतीमान झाला आहे. लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक, अंधश्रद्धा पसरवणे अशा गंभीर आरोपांमध्ये अडकलेल्या खरातविरोधात गुन्ह्यांची भर पडत आहे.

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन घडामोडी समोर येत असून तपास अधिकच गतीमान झाला आहे. लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक, अंधश्रद्धा पसरवणे अशा गंभीर आरोपांमध्ये अडकलेल्या खरातविरोधात गुन्ह्यांची भर पडत आहे.
दरम्यान, या प्रकरणात आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिर्डीतील एका हॉटेल मालकाची चौकशी सुरू करण्यात आली असून, ED ने शिर्डी आणि कोपरगाव येथे एकाच वेळी धाड टाकल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीतील हॉटेल ‘मॅरी गोल्ड’चे मालक निलेश जपे यांची सध्या चौकशी सुरू आहे. भोंदू अशोक खरात आणि निलेश जपे यांच्यात आर्थिक व्यवहार झाले असण्याची शक्यता तपासली जात आहे. या दोघांमध्ये आर्थिक संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराचा तपास आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Published on: Apr 23, 2026 01:43 PM
Follow Us