Baramati | सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; बारामती पोटनिवडणुकीवर पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक विशेष चर्चेत आहे. महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या असून, त्यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंब पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत विजयासोबतच मताधिक्य किती मिळणार, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे बारामतीत सहानुभूतीची लाट असल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान, अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना भविष्यातील राजकीय परिस्थितीबाबत सावध भूमिका मांडली. 2029 मध्ये “पवार विरुद्ध पवार” अशी लढत होणार का?, यावर त्यांनी स्पष्ट उत्तर देण्याचं टाळत “काळच ठरवेल” असं म्हटलं. कार्यकर्त्यांच्या अपेक्षांबाबत बोलताना त्यांनी, प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या नेत्याने पुढे यावं असं वाटतं, असं नमूद केलं.
तसेच, पुढील तीन वर्षांत राजकारणात अनेक बदल होऊ शकतात. युती, आघाड्या किंवा वेगवेगळे निर्णय घेण्यात येऊ शकतात, त्यामुळे भविष्यातील चित्र सध्या सांगणं कठीण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Published on: Apr 23, 2026 02:36 PM
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...