AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पश्चिम बंगालमध्ये रेकॉर्डब्रेक 91 टक्के मतदान, भाजपाचं नशीब उजळणार का? बारामतीमध्ये किती मतदान?

पश्चिम बंगाल, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. यावेळी या दोन्ही राज्यांत विक्रमी मतदान झाले आहे. बारामती, राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदानाची प्रक्रिया पार पडली.

पश्चिम बंगालमध्ये रेकॉर्डब्रेक 91 टक्के मतदान, भाजपाचं नशीब उजळणार का? बारामतीमध्ये किती मतदान?
west bengalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 23, 2026 | 9:08 PM
Share

West Bengal Tamil Nadu State Election Voting Percentage : राज्यात बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघांसाठीच्या पोटनिवडणुकीत आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. सोबतच आज (23 एप्रिल) पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील आणि तामिळनाडूतील मतदानही पार पडले. या सर्व निवडणुकांचा निकाल 4 मे रोजी लागणार आहे. राज्यातील दोन जागांसाठीची पोटनिवडणूक तसेच पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील निवडणूक ही अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये तर विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठाच पणाला लागली आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान बंगालमध्ये काही अपवाद वगळता मतदान सुरळीत पार पडले. विशेष म्हणजे या पहिल्याच टप्प्यात मतदानाचे सर्व रेकॉर्ड्स यावेळी मोडीत निघाले.

कोणत्या राज्यात किती मतदान?

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात मतदानाचे सर्व रेकॉर्ड तुटले आहेत. या पहिल्या टप्प्यात विक्रमी 91.35 टक्के मतदान झाले. या पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 152 जागांसाठी निवडणूक झाली होती. या राज्यात तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यात टक्कर आहे. त्यामुळे विक्रमी मतदान झाल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तामिळाडूमध्येही दिवसाअखेर 82.24 टक्के मतदान झाले.

बारामती, राहुरीत किती टक्के मतदान

आतापर्यंतच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50.74 टक्के मतदान झाले. बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.44 टक्के मतदान झाले. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याला यश आले नाही. बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सत्ताधारी तसेच विरोधक अशा सर्वांनीच पाठिंबा दिला आहे. त्याचा या निवडणुकीत विजय निश्चित मानला जात आहे.

तरीदेखील येत्या 4 मे रोजी नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पश्चिम बंगालमधील सत्ता कोणाच्या हातात जाणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Follow Us
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल