AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Graduate MLC: हर्षदा देशमुख विजयाच्या उंबरठ्यावर, अवघ्या 736 मतांनी वारं पुण्यातील वारं फिरणार, राष्ट्रवादीची विधान परिषदेत ‘पॉवर’वाढणार

Pune Graduate MLC Election Result 2026: पुण्याच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांची पॉवर दिसून आली. राष्ट्रवादीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांचा विजय दृष्टीक्षेपात असल्याचे मानले जात आहे. अवघ्या 736 मतांनी वारं पुण्यातील वारं फिरणार आहे.

Pune Graduate MLC: हर्षदा देशमुख विजयाच्या उंबरठ्यावर, अवघ्या 736 मतांनी वारं पुण्यातील वारं फिरणार, राष्ट्रवादीची विधान परिषदेत 'पॉवर'वाढणार
हर्षदा देशमुख यांचा विजय दृष्टीक्षेपात, अवघ्या 736 मतांनी वारं पुण्यातील वारं फिरणार, राष्ट्रवादीची विधान परिषदेत 'पॉवर'वाढणार
| Updated on: Oct 28, 2026 | 7:19 AM
Share

NCP Mahavikas Aaghadi Harshada Deshmukh-Jadhav: पुण्याच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांचा पॉवर गेम दिसला. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी मुसंडी मारली. त्यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत हर्षदा देशमुख-जाधव यांना 1 लाख 12 हजार 377 मतं मिळाली. विजयासाठी 1 लाख 13 हजार 113 मतांचा गोठा आहे. तो गाठण्यासाठी त्यांना अवघ्या 736 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे आता त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणाच बाकी राहिली आहे. तर भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी चांगली फाईट दिली. त्यांना 1 लाख 2 हजार मतं मिळाली आहेत.

मतांची आकडेवारी समोर

पुणे पदवीधर विभागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत झालेल्या मतदानात एकूण 2 लाख 26 हजार 224 मतं वैध ठरली आहेत. तर 17,299 मतं ही अवैध ठरली आहे. काल मतपेटीत चिठ्ठी मिळाली होती. पेन्शन वाढ आणि इतर मागण्या त्यातून करण्यात आल्या होत्या. त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत बाद होत असल्यावरून टोमणाही हाणला होता.

दरम्यान शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांना 1 लाख 12 हजार 377 मतं मिळाली. तर भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना 1 लाख 2 हजार मतं मिळाली आहेत. हर्षदा देशमुख जाधव यांना विजयासाठी 736 मतांची गरज आहे. विजयाचा निश्चित कोटा आणि मिळालेली मतं यामध्ये नाममात्र अंतर आहे. एलिमिनेशन फेरीतील दुसऱ्या पसंतीच्या मतांमधून हा कोटा अगदी सहज पूर्ण होणार आहे. यामुळे हर्षदा देशमुख जाधव या विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.

विधान परिषदेत राष्ट्रवादीची पॉवर वाढणार

भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी जोरदार फाईट दिली. पण महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवली होती. एक आमदार वाढल्याने आता विधान परिषदेत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पॉवर वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील गोळाबेरीज पवारांशिवाय होत नाही हे या निकालातून स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत शिंदे सेनेने सचिन सानप यांच्या पाठीमागे बळ उभे केले होते. महायुतीतील या दुहीनेही भाजपला फटका बसल्याची चर्चा आहे.

Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...