AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवार पुढची निवडणूक लढणार नाहीत? बड्या नेत्याने सांगितला जय पवारांच्या विधानाचा अर्थ

Sunetra Pawar : जय पवार यांनी 2029 ची विधानसभा निवडणूक लढण्यावर भाष्य केले आहे. यामुळे आता आगामी निवडणूक सुनेत्रा पवार लढणार नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर एका बड्या नेत्याने भाष्य केले आहे.

सुनेत्रा पवार पुढची निवडणूक लढणार नाहीत? बड्या नेत्याने सांगितला जय पवारांच्या विधानाचा अर्थ
Sunetra Pawar 2029Image Credit source: Google
| Updated on: Apr 23, 2026 | 9:11 PM
Share

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. या निवडणुकीच्या प्रचारावेळी अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी म्हटले होते की, ‘मला पक्षासाठी काम करायचं आहे. लोकांची जर इच्छा असेल की 2029 मध्ये मला उमेदवारी द्यावी तर ही त्यांची इच्छा आहे. मी आधीपासून बोलत आलो आहे की मी छोटा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार हा सामना होणार नाही.’ जय पवार यांच्या या विधानामुळे सुनेत्रा पवार पुढची निवडणूक लढवणार नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जय पवार यांच्या विधानाचा अर्थ सांगितला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जय पवार यांच्या विधानावर बोलताना

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बारामती पोटनिवडणुकीवर बोलताना म्हटले की, ‘पक्षाने आधीच पाठिंबा जाहीर केला होता. अजित दादांना श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही तो निर्णय घेतला. आता मतदानाची टक्केवारी किती होते आणि आकडा काय येतो त्यावर सगळं अवलंबून आहे. काँग्रेससोबत चर्चा झाली होती. विलंब झाला पण माघार घेण्यात यश आले होते.’

जय पवार यांच्या विधानाचा अर्थ

जय पवार यांच्या विधानावर बोलताना शिंदे म्हणाले की, ‘सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आता एक निवडणूक सुरु आहे. काही वेळेला वक्तव्य करणं गरजेचं नाही, आज ही चर्चा करणं गरजेचं नाही. फार जबाबदारीने बोलणं गरजेचं आहे. 2029 ला सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार नाही का असा त्याचा अर्थ होतो. पण अजित दादांच्या कुटुंबातील लोकांनी सध्या जबाबदारीने बोलणं गरजेचं आहे’ असं म्हणत जय पवार यांच्या विधानाचा अर्थ सांगितला.

विलीनीकरणावर शिंदे काय म्हणाले?

विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, ‘मित्रपक्षाला स्वतःच्या अस्तित्वाची लढाई करायची असते. हा धोका अजित दादांनी ओळखला होता आणि म्हणून पक्ष एकत्रित करण्याची तयारी सुरु होती. किती संख्या असली पाहिजे याचा आराखडा आणि नियोजन आम्ही केलं होत.’ अजित दादा मुख्यमंत्री झाले असते असंही शिंदे यांनी म्हटले होते.

भाजपवर टीका

विधानपरिषद निवडणूकीवर बोलताना शिंदे म्हणाले की, ‘आम्ही भूमिका जाहीर केली आहे. राज्यसभेला पवार साहेबांना त्यांनी पाठिंबा दिला होता. त्याच्यामुळे विधानपरिषदेच्या जागेसाठी उद्धव ठाकरे असतील किंवा अन्य कोणी आमचा पाठिंबा असेल. विधानपरिषद जागा वाढवण्यासाठी भाजप काही जीआर काढत आहेत का हे बघाव लागेल. इच्छुक संख्या जास्त आहे त्यामुळे नवीन जीआर काढून जागा वाढवतील’ असा टोला त्यांनी शिंदे यांना लगावला आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप