देवीच्या मंदिरातील भुस्खलनाचा थरारक CCTV, 5 भक्त ढिगाऱ्याखाली अडकले

काल संध्याकाळच्या सुमारास मंदिरात भूस्खलन झालं आहे. याचा अपघाताचा एक सीसीटीव्ही व्हिडिओदेखील समोर आला आहे.

देवीच्या मंदिरातील भुस्खलनाचा थरारक CCTV, 5 भक्त ढिगाऱ्याखाली अडकले
| Edited By: | Updated on: Oct 22, 2020 | 8:14 AM

विजयवाडा : एकीकडे कोरोनाचं संकट तर दुसरीकडे देशभरात नवरात्रीचा उत्सव साजरा होताना दिसत आहे. अशात एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. कनक दुर्गा मंदिरामध्ये एक भीषण अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. काल संध्याकाळच्या सुमारास मंदिरात भूस्खलन झालं आहे. याचा अपघाताचा एक सीसीटीव्ही व्हिडिओदेखील समोर आला आहे. (landslide VIDEO at Kanaka Durga Temple in Vijayawada Two injured)

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या विजयवाडा शहरामध्ये स्थित कनक दुर्गा मंदिरामध्ये बुधवारी संध्याकाळी अचानक भुस्खलन झालं. यावेळी तब्बल 5 लोक मलब्याखाली अडकले होते. पण तात्काळ त्यांना बाहेर काढण्यात यश आलं. यामध्ये 2 भक्तांना गंभीर इजा झाली असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.


या अपघातानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जनमोहन रेड्डी यांनी मंदिर नवीनीकरणासाठी आणि आधुनिकीकरण करण्यासाठी 70 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. कनक दुर्गा मातेचे मंदिर विजयवाड्यातील इंद्रकिलाद्री पर्वतावर स्थित आहे. काल दुर्गा मंदिराजवळ इंद्रकिलाद्री पर्वताचा खडक फोडून खाली कोसळला. मंदिराजवळील शेडवर खडक पडला. यामुळे तिथे उपस्थित सर्व भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

आता HDFC बँकेतून होणार मुंबई पोलिसांचे पगार, 1 कोटींपर्यंत आहे विमा कवच

यानंतर जिल्हाधिकारी एएम डी इम्तियाज आणि पोलीस आयुक्त बी श्रीनिवासुलू यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. नवरात्रीमुळे मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी असतानाच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान, सध्या मलबा बाहेर काढण्याचं काम सुरू असून पावसामुळे असा प्रकार घडला असावा असं पोलिसांनी म्हटलं आहे.

(landslide VIDEO at Kanaka Durga Temple in Vijayawada Two injured)