हॉकीपटूंचे लैंगिक शोषण करणाऱ्या क्रीडाशिक्षकाला जन्मठेप

कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने विजय विठ्ठल मनुगडे या आरोपी क्रीडाशिक्षकाला दोषी (Hockey player molestation) ठरवत अजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.

हॉकीपटूंचे लैंगिक शोषण करणाऱ्या क्रीडाशिक्षकाला जन्मठेप
Follow us
| Updated on: Aug 28, 2019 | 7:43 PM

कोल्हापूर: राज्य पातळीवर हॉकीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या एका विद्यार्थिनीवर बलात्कार करणे आणि इतर 3 विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण (Hockey player molestation) केल्याप्रकरणी आरोपी क्रीडाशिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने विजय विठ्ठल मनुगडे या आरोपी क्रीडाशिक्षकाला दोषी (Hockey player molestation) ठरवत अजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.

कोल्हापूरच्या राजेंद्रनगर येथील कोल्हापूर पब्लिक स्कूलमध्ये मे ते ऑगस्ट 2017 दरम्यान हा लैंगिक छळाचा प्रकार घडला होता. गुरू-शिष्याच्या परंपरेला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आल्यानंतर कोल्हापुरात एकच खळबळ उडाली होती. वकील संघटनांनीही या घटनेचा निषेध करत न्यायालयाच्या आवारातच आरोपी शिक्षकाला काळे फासण्याचा प्रयत्न केला होता.

काय आहे प्रकरण?

आरोपी विजय मनुगडे कोल्हापूर पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून काम करत होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली मुलींच्या हॉकी टीमने राज्यपातळीवर चमकदार कामगिरी केली. मात्र, आरोपी मनुगडेने मे 2017 रोजी यातील 4 अल्पवयीन खेळाडू मुलींना सरावाच्या बहाण्याने शाळेतील एका खोलीत बोलावले. तेथे त्यांच्याशी लैंगिक चाळे करून त्याचे चित्रीकरण केले. यानंतर हे चित्रीकरण घरी दाखवण्याची धमकी देत ऑगस्ट 2017 पर्यंत त्याने एका मुलीवर वारंवार बलात्कार केला.

इतर 3 विद्यार्थिनींवरही लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळायचे असेल, तर हे सहन करावे लागेल असे सांगत आरोपी शिक्षकाने हे कृत्य केले. मुली राज्यपातळीवर यश मिळवत असल्याने मनुगडेने पालकांचाही विश्वास संपादन केला.

ऑगस्ट 2017 मध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात मनुगडेविरोधात 4 वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी मनुगडेवर कारवाई करून त्याच्याविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. मनुगडेवर दाखल असलेल्या चारही तक्रारींचा आज (28 ऑगस्ट) एकत्रित निकाल जिल्हासत्र न्यायालयात लागला.

फक्त दोन वर्षात खटला निकाली

अल्पवयीन मुलींचे शोषण करणाऱ्या या क्रीडा शिक्षकाला जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी आजन्म कारावासासह प्रत्येक गुन्ह्यात एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंडातील रक्कम पीडित मुलींना देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील बहुचर्चित अशा या खटल्याचा निकाल अवघ्या 2 वर्षात लागल्याने आणि आरोपीला आजन्म करावासाची शिक्षा झाल्याने सर्वच स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे. लैंगिक शोषण प्रकरणात क्रीडाशिक्षकाला आजन्म कारावासाची शिक्षण होण्याची कोल्हापूर सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.