तुम्हालाही उपाशी पोटी कॉफी पिण्याची सवय आहे का?

| Updated on: Aug 12, 2019 | 9:05 PM

उपाशी पोटी झोपेतून उठल्यानंतर गरम गरम कॉफी प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यानंतर आळस जरी कमी होत असला, तरीही याचे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

तुम्हालाही उपाशी पोटी कॉफी पिण्याची सवय आहे का?
Follow us on

मुंबई : आपल्यापैकी अनेकजण झोप घालवण्यासाठी सातत्याने कॉफी पितात. काहींना तर उपाशी पोटी झोपेतून उठल्यानंतर गरम गरम कॉफी प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यानंतर आळस जरी कमी होत असला, तरीही याचे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

एका रिसर्चनुसार, रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने तुमच्या शरीरात कोर्टिसोल हार्मोनची वाढ होते. कोर्टिसोल हार्मोन आपल्या शरीरात मेटाबॉलिज्म, इम्यून सिस्टम आणि स्ट्रेसचे व्यवस्थापन करण्यास मदत करते. त्यामुळे जर या हार्मोनची वाढ झाली तर त्याचे शरीरात वाईट परिणाम होऊ शकतात.

सकाळी उठल्यानंतर कॉफी पिणाऱ्या अनेकांमध्ये मूड स्विंग किंवा तणावाचे प्रमाण जास्त असते. मात्र जे लोक रिकाम्या पोटी कॉफी पित नाहीत, त्यांच्यात तणावाचे प्रमाण फार कमी असते. विशेष म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिणाऱ्या लोक सर्वाधिक तणावग्रस्त असतात.

रिकाम्या पोटी कॉफी पिणाऱ्यांच्या शरीरात जास्त अॅसिड जमा होते. त्याचा परिणाम आपल्या पचनशक्तीवर होतो. विशेष म्हणजे कोणत्याही खाण्यातील पोषक तत्त्वे शरीराला मिळत नाही. त्यामुळे जरी तुम्ही निरोगी अन्न खाल्ले तरी ते तुमच्या शरीरासाठी व्यर्थ ठरु शकते.

सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपल्या हृदयाचे ठोके हे सामान्य पद्धतीत असतात. मात्र कॉफी प्यायल्यानंतर आपले हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढतो. यामुळे आपल्या रक्ताभिसरणावरही परिणाम होतो आणि रक्तदाब (blood pressure) वाढते. या सर्व बाबींमुळे तुमच्या हृदयावर वाईट परिणाम होतो.

झोपेबाबत शरीराचे काही ठराविक नियम असतात. सकाळी झोपेतून उठल्यानंतर कॉफी प्यायल्याने तुम्ही तुमच्या झोपेला नियंत्रित करता. मात्र तुमच्या शरीरात कॅफीनचा प्रभाव असेपर्यंत तुम्हाला अॅक्टिव असल्यासारखे वाटते. पण कॅफीनचा प्रभाव संपल्यानंतर पुन्हा तुम्हाला झोप येते.

दरम्यान कॉफी पिण्याची योग्य वेळ ही दुपारी असते असे तज्ज्ञ म्हणतात. कारण त्यादरम्यान आपले शरीर कामात सक्रीय झालेले असते. त्यावेळी आपला सकाळचा नाश्ता झालेला असल्याने त्याला कॉफी पिऊन झाल्यावर अॅसिडिटीसारखा त्रास होत नाही. त्याशिवाय संध्याकाळी उशिरा कॉफी प्यायल्याने तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतात.