
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव 17 ऑक्टोबर पासून घटस्थापनेने सुरू होणार आहे. त्यापूर्वी देवीच्या मुख्य प्रवेशद्वार व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

कोरोना संकट असल्यामुळं तुळजाभवानी देवीचा यंदाचा नवरात्र भक्तांविना अत्यंत साधेपणाने साजरा होणार असून भाविकांना तुळजापूर शहरात प्रवेश बंदी असणार आहे.

कोरोनाचा संसर्ग असल्याने यावेळी विद्युत रोषणाई करताना मास्क घालणे , डिस्टनस ठेवणे आदी कोरोना विषयक जनजागृती करण्यात आली.

तुळजाभवानी देवीचे महिषासूरमर्दिनी रूप, छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून स्वारी करतानाचे प्रसंग रोषणाईत पाहायला मिळतात.

कोरोना योद्ध्यांचा सन्मान,कोरोना विषाणू प्रादुर्भावाविषयी जनजागृती विद्युत रोषणाई द्वारे करण्यात आली आहे.

तुळजाभवानी देवीचे महिषासूरमर्दिनी रूप, छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून स्वारी करतानाचे प्रसंग रोषणाईत पाहायला मिळतात.तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, राज्यातून भाविक येतात मात्र, यावर्षी शहरात प्रवेश बंदी असणार आहे.