गडचिरोलीतील शहिदांची यादी, मराठवाडा, विदर्भातील जवानांचा समावेश

| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवान शहीद झाले आहेत. शिवाय चालकाचाही मृत्यू झाला. पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांवर नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलं. महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी काल रात्रीच रस्त्याचं काम सुरु असलेल्या ठिकाणी तब्बल 30 वाहने पेटवून दिली. […]

गडचिरोलीतील शहिदांची यादी, मराठवाडा, विदर्भातील जवानांचा समावेश
Follow us on

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवान शहीद झाले आहेत. शिवाय चालकाचाही मृत्यू झाला. पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांवर नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलं. महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी काल रात्रीच रस्त्याचं काम सुरु असलेल्या ठिकाणी तब्बल 30 वाहने पेटवून दिली. त्यानंतर आज पुन्हा नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून भीषण हल्ला केला.

शहीद जवानांची यादी

1) साहुदास मदावी – कुरखेडा- गडचिरोली

2) प्रमोद भोयर –  देसाईगंज- गडचिरोली

3) किशोर बोबाटे- आरमोरी- गडचिरोली

4) योगाजी हालमी- कुरखेडा- गडचिरोली

5) कुरणशाह दुगा- आरमोरी- गडचिरोली

6)लक्ष्मण कोदापे- कुरखेडा- गडचिरोली

7) भूपेश वालोदे-लाखणी- भंडारा

8) नितीन घोरमारे- साकोरा- भंडारा

9) राजु गायकवाड- मेहकर बुलढाणा

10) सर्जेराव खरडे- देउळगाव बुलढाणा

11) दिपक सुरुषे- मेहकर बुलढाणा

12) संतोष चव्हाण-औंधा-हिंगोली

13) आरिफ तौशिब शेख-पाटोदा बीड

14) अमृत भदादे- कुही नागपुर

15) अग्रमन रहाटे-अरणी- यवतमाळ