West Bengal Lockdown : | पश्चिम बंगालमध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला

| Updated on: Jun 24, 2020 | 8:54 PM

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पश्चिम बंगाल सरकारने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे (Lockdown extended till July 31 in West Bengal).

West Bengal Lockdown : | पश्चिम बंगालमध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगाल राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे (Lockdown extended till July 31 in West Bengal). पश्चिम बंगालमध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र, या लॉकडाऊनच्या टप्प्यात काही प्रमाणात सूट देण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे (Lockdown extended till July 31 in West Bengal).

पश्चिम बंगालमध्ये 31 जुलैपर्यंत रेल्वे सेवा आणि मेट्रो पूर्णपणे बंद राहतील. याशिवाय शाळा, कॉलेजदेखील बंद राहणार आहेत. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या राज्यांच्या यादीत पश्चिम बंगाल सातव्या क्रमांकावर आहे. या राज्यात आतापर्यंत एकूण 14 हजार 728 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 580 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन खुलण्याबाबत म्हणजेच ‘अनलॉक 2.0’ विषयी विचार करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पश्चिम बंगाल सरकारने 31 जुलैपर्यंत म्हणजे आणखी एक महिन्यासाठी लॉकडाऊन वाढवला आहे.

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 4 लाख 56 हजाराच्याही पुढे गेला आहे. तर 14 हजार 400 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा 66 हजारांवर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाख 39 हजारांच्या पुढे गेला आहे. दरम्यान, एकूण रुग्णांपैकी जवळपास 50 टक्के रुग्ण बरेदेखील झाले आहेत. मात्र, नव्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे.

हेही वाचा : नागरिकांची सहनशीलता संपली तर उद्रेक होईल, केडीएमसी अधिकाऱ्यांना प्रवीण दरेकरांचा इशारा, आमदार रविंद्र चव्हाणही भडकले