नागरिकांची सहनशीलता संपली तर उद्रेक होईल, केडीएमसी अधिकाऱ्यांना प्रवीण दरेकरांचा इशारा, आमदार रविंद्र चव्हाणही भडकले

नागरिकांची सहनशीलता संपली, तर त्यांचा उद्रेक होईल. ते रुग्णालय तोडून टाकतील, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला(Pravin darekar angry on KDMC officers).

नागरिकांची सहनशीलता संपली तर उद्रेक होईल, केडीएमसी अधिकाऱ्यांना प्रवीण दरेकरांचा इशारा, आमदार रविंद्र चव्हाणही भडकले

ठाणे : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाने थैमान घातलं आहे (Pravin darekar angry on KDMC officers). यादरम्यान कोव्हिड रुग्णालयात रुग्णांना पुरेसी सुविधा मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार रविंद्र चव्हाण आणि विधान परिषदेचे वरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी डोंबिवलीत शास्त्रीनगर कोव्हिड रुग्णालयाची पाहणी केली. कोरोनामुळे शहरात भीषण परिस्थिती असताना महापालिकेकडून चांगली व्यवस्था केली जात नाही. त्यामुळे रविंद्र चव्हाण आणि प्रवीण दरेकर अधिकाऱ्यांवर भडकले (Pravin darekar angry on KDMC officers).

कोरोना रुग्णांना रुग्णालयात अपुऱ्या सुविधा मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांची सहनशीलता संपली, तर त्यांचा उद्रेक होईल. ते रुग्णालय तोडून टाकतील, असा घणाघात प्रवीण दरेकर यांनी केला. तर रविंद्र चव्हाण यांनी महापालिकेकडून चांगली व्यवस्था केली जात नाही म्हणत अधिकाऱ्यांना सुनावलं.

हेही वाचा : पडळकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आषाढी पूजेला येऊ नये, आता फडणवीस म्हणतात….

प्रवीण दरेकर आणि रविंद्र चव्हाण यांचा केडीएमसी अधिकाऱ्यांनर भडकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कोरोनाचं भीषण संकट असताना महापालिकेकडून पाहिजे तशी सुविधा शहरात केली जात नाही. त्यामुळे दरेकर आणि चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारणं योग्य असल्याची प्रतिक्रिया शहरातील सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दररोज वाढत आहे. केडीएमसी क्षेत्रात दररोज 200 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. कल्याण-डोबिंवलीत कोरोनाबाधितांची संख्या 4 हजारांच्यावर गेली आहे. मात्र, तरीही महापालिकेकडून पाहिजे तशी व्यवस्था करण्यात आलेली नाही.

शहरात रस्त्यांवर भाजी खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळते. विशेष म्हणजे अनेकदा केडीएमसीची गाडी परिसरात उभी असलेली दिसते. मात्र, तरीही सर्रासपणे बाजार सुरु असतो.

हेही वाचा : नोकरीवरुन काढल्यास तक्रारीसाठी हेल्पलाईन सुरु करा, सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *