कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्क, लखनऊमध्ये 25 वर्षीय डॉक्टरलाही कोरोनाची लागण

| Updated on: Mar 18, 2020 | 5:55 PM

कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे लखनऊमध्ये 25 वर्षीय निवासी डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे (Lucknow doctor tests corona positive).

कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्क, लखनऊमध्ये 25 वर्षीय डॉक्टरलाही कोरोनाची लागण
Follow us on

लखनऊ : कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे लखनऊमध्ये 25 वर्षीय निवासी डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे (Lucknow doctor tests corona positive). हा डॉक्टर लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीत कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आला. किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीत कॅनडाच्या एका कोरोनाबाधित महिला डॉक्टरवर उपचार सुरु होते. याशिवाय तिच्या पतीलाही तिथे निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे (Lucknow doctor tests corona positive). त्या दोघांच्या संपर्कात आल्यामुळे किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या निवासी डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली.

कॅनडाची निवासी महिला डॉक्टर गेल्या आठवड्यात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी भारतात आली होती. या महिलेचं सासर लखनऊचं आहे. तिच्यासोबत तिचा पतीही कॅनडाहून आला होता. या महिलेची अचानक प्रकृती बिघडल्याने तिला लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीत दाखल करण्यात आलं.

तिथे उपचारादरम्यान महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. या महिलेला लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं. याशिवाय तिच्या पतीलाही दुसऱ्या कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं.

दरम्यान, किंग जॉर्ज मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या विलगीकरण कक्षात महिलेवर उपचार करत असताना लखनऊच्या 25 वर्षीय निवासी डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली. त्याच्यासोबत अन्य 14 जणांची ही मेडीकल टेस्ट करण्यात आली. त्यात इतर 14 जणांना कोरोनाची लागण नसल्याचं निषपन्न झालं. या डॉक्टरलाही विलगीकरण कक्षात ठेवलं असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती हॉस्पिटलचे प्रवक्ते डॉ. सुधीर सिंह यांनी दिली.

याशिवाय किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या सर्व विद्यार्थ्यांना 2 एप्रिलपर्यंत सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती डॉ. सुधीर सिंह यांनी दिली.

संबंधित बातम्या : 

Corona Effect | पुण्यातील दारु दुकाने 31 मार्चपर्यंत बंद, नागपुरात चहा-पान टपऱ्या बंदचं आवाहन

Corona | हातावर विलगीकरणाचे शिक्के, तरीही रेल्वेने प्रवास, पालघरजवळ चेन खेचून ट्रेन रोखली!

कोरोना खबरदारी : सलून बंद ते देऊळ बंद, पुण्यात काय काय बंद?

Temples Closed | राज्यभरात देऊळ बंद, मंदिर परिसरात शुकशुकाट, कोणकोणती मंदिरं बंद?