Corona Virus : धक्कादायक! 167 कोरोना संशयित रुग्ण बेपत्ता, शोध सुरु

जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असताना भारतात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाबमधून तब्बल 167 कोरोना संशयित रुग्ण बेपत्ता (punjab corona patient missing) झाले आहेत.

Corona Virus : धक्कादायक! 167 कोरोना संशयित रुग्ण बेपत्ता, शोध सुरु

चंदीगड : जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असताना भारतात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाबमधून तब्बल 167 कोरोना संशयित रुग्ण बेपत्ता (punjab corona patient missing) झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना संशयित रुग्ण बेपत्ता झाल्याने प्रशासनालाही धडकी भरली आहे. या बेपत्ता संशयित रुग्णांचा कसून शोध घेतला जात आहे. बेपत्ता असलेल्या 29 संशयितांना शोधले असून 167 कोरोना संशयित बेपत्ता आहेत, असं सांगितलं जात (punjab corona patient missing) आहे.

हे 167 बेपत्ता कोरोना संशयित रुग्ण नुकतेच परदेश दौऱ्यावरुन परतले होते. पंजाबच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कोरोना संशयितांची यादी दिली होती. आता आरोग्य विभाग या बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे. जेणेकरुन त्यांना सूरतमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवले जाऊ शकते.

“परदेशातून परतलेल्या लोकांची माहिती काढण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांवर 119 लोकांना शोधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी आतापर्यंत 12 लोकांना शोधून काढले आहे. तर आरोग्य विभागावर 77 लोकांना शोधून काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आरोग्य विभागानेही 17 संशयितांना शोधून काढले आहे”, असं सिव्हिल सर्जन डॉक्टर राजेश कुमार बग्गा यांनी सांगितले.

डॉक्टर बग्गा म्हणाले, “लुधियानामध्ये 167 लोक बेपत्ता आहेत. आतापर्यंत संशयितांची माहिती मिळत नाही याचे कारण त्यांच्या पासपोर्टमधील नाव, पत्ता आणि नंबर खोटे असू शकते. असे वाटते की पत्ते आणि फोन नंबरमध्ये बदल केले आहेत. आमची पथके सक्रीय असून त्यांचा शोध घेत आहेत. लवकरच त्यांचा शोध लागेल.”

कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असताना 14 मार्च रोजी पंजाबमधून एक धक्कादायक माहिती समोर आली होती. आरोग्य विभागाकडून मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले होते की, आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे 335 लोक बेपत्ता आहेत. बाहेरुन येणारे 335 लोक गायब आहेत. त्यांची स्क्रीनिंग झाली नाहीये आणि ते आता कुढे याचा शोध घेत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *