Temples Closed | राज्यभरात देऊळ बंद, मंदिर परिसरात शुकशुकाट, कोणकोणती मंदिरं बंद?

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील मंदिरं भक्तांसाठी बंद (Maharashtra Temples Closed) करण्यात आली आहे.

Temples Closed | राज्यभरात देऊळ बंद, मंदिर परिसरात शुकशुकाट, कोणकोणती मंदिरं बंद?

मुंबई : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील मंदिरं भक्तांसाठी बंद (Maharashtra Temples Closed) करण्यात आली आहे. मोठमोठ्या मंदिरांनी दरवाजे बंद करुन, गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर, शिर्डीचं साई मंदिर, कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर अशी सर्वच मोठी देऊळ बंद झाली आहेत. (Maharashtra Temples Closed)

पंढरपुरात शुकशुकाट

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद झाल्यामुळे मंदिर परिसरात कमालीचा शुकशुकाट आहे. सतत गजबजलेला परिसर भाविकांविना ओसाड पडला आहे. व्यापाऱ्यांनीही 31 मार्चपर्यंत मंदिर परिसरात असलेली प्रासादिक, खेळणी तसेच हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  ज्या रस्त्यावरुन गर्दीमुळे चालणंही कठीण होतं, तिथे शुकशुकाट आहे. पंढरीच्या इतिहासात पहिल्यांदाच असे चित्र पहायला मिळत आहे.

साई मंदिर

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मंगळवार दुपारी तीन वाजल्यापासून साईमंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे शिर्डी शहर आणि मंदिर परिसरात पहिल्यांदाच शुकशुकाट जाणवत आहे. व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात दुकाने, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद केले आहेत.रस्त्यावरही शुकशुकाट आहे. साई मंदिर बंद असले तरी धार्मिक पूजा- अर्चा नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे. 

तुळजाभवानी मंदिर

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मंदिर काल पहाटे 5 वाजता विधिवत पूजा करून भाविकांसाठी दर्शनासाठी बंद करण्यात आले. कालपासून देवीचे मंदिर सरकारचे पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असून तुळजाभवानी देवीची चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे.

देवीचे मंदीर दर्शनासाठी बंद असले तरी धार्मिक विधी व पूजा या महंत व पुजारी यांच्याकडून केल्या जाणार आहेत. कोरोना आजारामुळे गर्दी टाळण्यासाठी मंदिर संस्थानने हा निर्णय घेतला आहे.

चंद्रपूरचे महाकाली मंदिर 

द्रपूरचे ऐतिहासिक देवी महाकाली मंदिर बंद करण्यात आले आहे. काल दुपारी प्रशासनाच्या निर्देशानंतर मंदिराची दार भाविकांसाठी बंद केली गेली. 25 मार्चपासून देवी महाकालीच्या चैत्र नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. महाराष्ट्र व लगतच्या चार राज्यांमधून लाखो भाविक देवी महाकाली दर्शनासाठी चंद्रपुरात पोहोचतात. मात्र कोरोना आजाराचे सावट व त्याचा संसर्ग टाळण्यासाठी यात्रा स्थगित केली गेली आहे.

राज्यातील कुठली मंदिरं बंद राहणार?

 • विठ्ठल-रुक्मिणी मंदिर – पंढरपूर
 • साई बाबा मंदिर – शिर्डी
 • सिद्धिविनायक मंदिर मुंबई
 • गणपती मंदिर – गणपतीपुळे
 • अंबाबाई मंदिर – कोल्हापूर
 • तुळजाभवानी मंदिर – तुळजापूर
 • गजानन महाराज मंदिर – शेगाव
 • खंडोबा मंदिर – जेजुरी
 • मुंबादेवी मंदिर – मुंबई
 • एकविरा देवी – कार्ला
 • महालक्ष्मी मंदिर – सारसबाग
 • श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर – पुणे
 • प्रभू वैद्यनाथा मंदिर – परळी, बीड
 • कसबा गणपती – पुणे
 • दत्त मंदिर – श्री क्षेत्र नृसिंहवाडी

Published On - 1:49 pm, Wed, 18 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI