Maharashtra News LIVE Update | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना न्यायालयीन कोठडी

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना न्यायालयीन कोठडी
babasaheb-purandare
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 4:31 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Nov 2021 10:29 PM (IST)

    मुंबई

    सॅमसंग मोबाईल सर्विस सेंटरला लागली आग

    कांजूरमार्ग परिसरात अॅपेक्स कंपनीतील घटना

    रात्री 9 वाजून 42 मिनिटांनी लागली आग

    लेवल 2 ची आग

    अग्नीशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल

    आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु

  • 15 Nov 2021 10:11 PM (IST)

    अमरावती

    संचारबंदी असताना सुद्धा परतवाडा येथे भर चौकात 32 वर्षीय युवकाची हत्या

    निखिल मंडले असे युवकाचे नाव

    आरोपी विकी धाडसे याला केली पोलिसांनी अटक

    जुन्या वैमन्यास्यातून हत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती

     

     

  • 15 Nov 2021 10:10 PM (IST)

    मुंबई

    कांजूरमार्गला भीषण आग

    हायपी इंडस्ट्रियल इस्टेट लागली आहे आग

    फायर ब्रिगेडच्या 11 गाड्या घटनास्थळी रवाना

     

  • 15 Nov 2021 09:30 PM (IST)

    भंडारा

    – चंद्र ज्योतीच्या झाडाची बिये खाल्याने 19 बालकांना विषबाधा

    – जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील शिवणी गावातील 19 लहान मुलांना विषबाधा झाली आहे.

    – मोहाडी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून सद्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सर्व मुले 6 ते 12 वर्ष वयोगटातील आहेत.

  • 15 Nov 2021 08:25 PM (IST)

    अशोक‌ चव्हाण 

    देगलूक मतदारसंघातील जितेश अंतापूरकर यांची केंद्रीय नेत्यांशी उद्या भेट घडवणार

    नांदेड ते हैदराबाद ग्रीन फिल्ड रस्ता.. या संदर्भात चर्चा केला आहे

    औरंगाबाद-पुणे या रसत्याबाबत चर्चा केला.

    मराठवाड्यातील बुलेट ट्रेन विनंती केली.

    ते पॉझिटिव्ह आहेत

    प्रज्ञा सातव यांची जागा घेणार

    नवाब मलिक वाद : राजकारणाचा स्तर घसरू नये.

    दंगलीच्या घटना ही बाब गंभीर आहे. या गोष्टी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करावी लागते. म्हणून कारवाई केली.

    पंडित नेहरूंच्या जयंती दिनी सत्ताधारी नेते उपस्थित नाही, यावर नाराजी. ही नवी परंपरा या सरकारने सुरू केली आहे

  • 15 Nov 2021 07:11 PM (IST)

    मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानात पुन्हा एकदा कोविड 19 संसर्गाचा शिरकाव

    मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानात पुन्हा एकदा कोविड 19 संसर्गाचा शिरकाव

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी OSD सुधीर नाईक यांची कोविड 19 संसर्ग चाचणी पाँझिटीव्ह आली आहे

    त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबई सेंट्रल येथील वाँक्हार्ट हाँस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय

    त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांची तात्काळ कोविड 19 संसर्ग तपासणी करण्यात येत आहे

    ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांचीही अधिक काळजी घेण्यात येत आहे

    मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानाचे सँनिटायझेशन करण्यात आलंय

  • 15 Nov 2021 07:09 PM (IST)

    नवी दिल्ली

    नवी दिल्ली अशोक चव्हाण गडकरी यांच्या भेटीला

    केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची अशोक चव्हाण घेणार भेट

    भेटीचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात

    दोन राजकीय नेत्यांमध्ये कोणती चर्चा होणार ?

    काँग्रेस नेते मंत्री अशोक चव्हाण नवी दिल्लीतील गडकरी यांच्या निवासस्थानी दाखल

  • 15 Nov 2021 05:07 PM (IST)

    प्रवीण दरेकर

    नवाब मलिकसारख्या प्रवृत्ती दंगलीला कारणीभूत

    प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

     

  • 15 Nov 2021 05:04 PM (IST)

    नाना पटोले ऑन विक्रम गोखले

    या माणसाला मी ओळखत नाही

    पण ज्या सोसायटी मध्ये ते राहतात त्या बद्दल च्या त्यांच्या भावना असतील मात्र देशात असंख्य लोक गरीब आहेत शेतकरी आहेत त्यांच्या जीवनात काय आहे ते जरा झाकून बघा

    पैसे घेऊन सिनेमे तयार करायचे आणि त्याच लोकांच्या तिकिटांच्या भरोष्यावर पैसे कमवायचे आणि त्यांच्या बद्दल असे बोलायचे ही गोष्ट लाजिरवाणी आहे

    अश्या प्रकार स्टेटमेंट करून लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करू नका अशी त्यांना विनंती आहे

  • 15 Nov 2021 04:37 PM (IST)

    दिलीप वळसे पाटील

    नवाब मलिक यांनी केलेले आरोप याबाबत डिटेल्स मला माहित नाही

    पण हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करण्याचे आदेश दिलेय

    चौकशीचा रिपोर्ट आल्यानंतर कोण सहभागी आहे हे कळेल

    जबाबदार कोण आहे हे इतक्यात कळणार नाही

    चौकशीनंतरच कोण जबाबदार आहे हे कळेल

    पोलिसांसाठी सुविधा उपलब्ध करणार

    स्पेशल हॉस्पिटल उभारण्याचा नवा प्रस्ताव आणणार

  • 15 Nov 2021 04:35 PM (IST)

    यवतमाळ

    मिलींद तेलतुंबडे चा मृतदेह त्याच्या घरी आणला

    गडचिरोली पोलिसांच्या दोन वाहनांसह 10 सस्त्रधारी पोलिसांची टीम

    मृतदेह सोबत त्याच्या घरी दाखल

  • 15 Nov 2021 04:34 PM (IST)

    दिलीप वळसे पाटील पत्रकार परिषद

    गडचिरोली आणि छत्तीसगड सीमेवर गस्त घालत असताना काही नक्षलवादी त्या भागात असल्याचा सुगावा लागला,

    पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली, यात 26 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला,

    चार जवान जखमी झाले, आज मी गडचिरोली ला भेट दिली, जवानांचं अभिनंदन केलं, आज जखमी जवानांची मी घेत घेतली,

    त्यांची प्रकृती उत्तम आहे, लवकरच ते रुजू होतील,

    राज्यात दोन तीन घटना झाल्या त्यात पोलिस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी गेले आहेत, त्या ठिकाणची स्थिती नियंत्रणात आणत आहेत,

    शौर्य गाजविणाऱ्या जवानांना सरकारी नियमानुसार बक्षिसे देण्यात येईल, अधिक बक्षीस देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू

  • 15 Nov 2021 12:08 PM (IST)

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत बाबासाहेब पुरंदरेंवर अंत्यसंस्कार

    बाबासाहेब पुरंदरेंना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी

  • 15 Nov 2021 11:30 AM (IST)

    मैदानात बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाला शासकीय इतमामात सलामी दिली जाईल

    पुणे

    धार्मिक मंत्रोच्चार करून पार्थिव बाहेर काढलं जाणार,

    मैदानात पार्थिवाला शासकीय इतमामात सलामी दिली जाईल,

    त्यानंतर पार्थिवाला अग्नि दिला जाणार,

    विद्युतदाहीनीत पार्थिवाला अग्नी दिला जाईल

  • 15 Nov 2021 11:25 AM (IST)

    बाबासाहेब पुरंदरेंचं पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल

    बाबासाहेब पुरंदरेंचं पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल

    बाबासाहेब पुरंदरेंना अखेरचा निरोप देण्यासाठी वैकुंठ स्मशानभूमीत मोठी गर्दी

    थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार

    बाबासाहेब पुरंदरेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार

  • 15 Nov 2021 11:13 AM (IST)

    बाबासाहेबांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी – गिरीश बापट

    गिरीश बापट –

    बाबासाहेबांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. माझा आणि त्यांचा वयक्तिक संपर्क होता, त्यांच्यासोबत चार पाच वेळा किल्ल्यावर गेले होतो, शिवाजी महाराजांना बाबासाहेबांनी जगभर पोचवलं,

  • 15 Nov 2021 11:01 AM (IST)

    बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव थोड्याच वेळात अंतिम यात्रेसाठी निघणार 

    – बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव थोड्याच वेळात अंतिम यात्रेसाठी निघणार

    – तयारी पूर्ण झालीय

  • 15 Nov 2021 10:50 AM (IST)

    12 वाजेपर्यंत बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचेल

    पुणे –

    12 वाजेपर्यंत बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचेल

    वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

    अंत्यविधीची तयारी पूर्ण

  • 15 Nov 2021 09:48 AM (IST)

    राज ठाकरेंकडून बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन

  • 15 Nov 2021 09:32 AM (IST)

    आपण आमचे जीवन समृद्ध केलेत – संजय राऊत

  • 15 Nov 2021 09:31 AM (IST)

    बाबासाहेब पुरंदरे यांच्या अंतिम दर्शनासाठी राज ठाकरे पुण्यात दाखल

    बाबासाहेब पुरंदरे यांच्या अंतिम दर्शनासाठी राज ठाकरे पुण्यात दाखल

  • 15 Nov 2021 09:29 AM (IST)

    महाराष्ट्राचे दैवत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं जाणे अत्यंत वेदनादायी आणि दुःखद – गडकरी

  • 15 Nov 2021 09:23 AM (IST)

    महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला – अजित पवार

  • 15 Nov 2021 09:22 AM (IST)

    मनाला अतिशय वेदना होत आहेत, त्यांच्या आठवणी डोळ्यापुढे येत आहेत – फडणवीस

  • 15 Nov 2021 09:16 AM (IST)

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे दीर्घायुषी होते – शरद पवार

    शरद पवार –

    महाराष्ट्राच्या नव्या पिढीला इतिहास सांगून जनजागृती करून ज्यांनी शेकडो व्याख्याने घेतली आणि नव्या पिढीला याबाबत आस्था निर्माण केली असे बाबासाहेब पुरंदरे आपल्यात नाहीत

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे दीर्घायुषी होते

    वयाची शंभरी लोकांशी सुसंवाद ठेवत त्यांनी पार पाडली

    शिवरायांचं चरित्र त्यांनी लोकांसमोर ठेवलं

    शरद पवारांनी शिवशाहीर पुरंदरेंना श्रद्धांजली वाहिली

  • 15 Nov 2021 09:11 AM (IST)

    शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही – मुख्यमंत्री

    राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर शोक व्यक्त

  • 15 Nov 2021 09:05 AM (IST)

    बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

    बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत 
  • 15 Nov 2021 09:03 AM (IST)

    बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाने एका युगाचा अंत – अमित शाह

  • 15 Nov 2021 09:00 AM (IST)

    बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाच्या बातमीने मन अत्यंत व्यथित झाले आहे – अमित शाह

  • 15 Nov 2021 08:57 AM (IST)

    मोदींकडून बाबासाहेब पुरंदरेंच्या आठवणींना उजाळा

  • 15 Nov 2021 08:52 AM (IST)

    बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झालीये – पंतप्रधान मोदी

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

  • 15 Nov 2021 07:49 AM (IST)

    कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

    कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

    आज पहाटे अडीच वाजता अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

    वारकरी प्रतिनिधी म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची महापूजा करण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कोंडिबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाइ टोणगे यांना मिळाला

  • 15 Nov 2021 07:45 AM (IST)

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन

    पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयानं बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली आहे

    आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला

  • 15 Nov 2021 07:44 AM (IST)

    वंदनीय शिवशाहिरांना भावपूर्ण श्रद्धांजली, मुरलीधर मोहोळ यांचं ट्विट

    वंदनीय शिवशाहिरांना भावपूर्ण श्रद्धांजली, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचं ट्विट