AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणातलं पाणी मराठवाड्याला देण्यासाठी मेगाप्लॅन, कॅबिनेटचीही मंजुरी

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणातील पाणी वळवण्याचा मार्ग ‘तत्वतः’ मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रस्तावित नदीजोड प्रकल्पाला चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली.

कोकणातलं पाणी मराठवाड्याला देण्यासाठी मेगाप्लॅन, कॅबिनेटचीही मंजुरी
| Updated on: Jul 30, 2019 | 11:39 PM
Share

मुंबई : दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणातील पाणी वळवण्याचा मार्ग ‘तत्वतः’ मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रस्तावित नदीजोड प्रकल्पाला चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली. जलसंपदा विभागाने आज मंत्रिमंडळासमोर या प्रकल्पाचे सादरीकरण केलं. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयानुसार आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्यांतर्गत नार-पार-गिरणा, पार गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी आणि दमणगंगा-एकदरे-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून न घेता राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून घेत त्यांचे राज्याच्या निधीतून त्वरित काम सुरु केले जाईल. या नदीजोड प्रकल्पांमुळे मुंबई शहरासाठी 31.60 अब्ज घनफूट, गोदावरी खोऱ्यातील मराठवाडा भागात 25.60 अब्ज घनफूट आणि तापी खोऱ्यासाठी 10.76 अब्ज घनफूट पाणी कोकणातून उपलब्ध होईल.

‘360 अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी गोदावरीत वळवणार’

पश्चिमवाहिनी नदीखोऱ्यातील (कोकण) उल्हास, वैतरणा, नार-पार आणि दमणगंगा खोऱ्यात एकूण 360 अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी उपलब्ध आहे. हे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणे शक्य आहे. त्यासाठी नवीन नदीजोड योजनांचे सविस्तर सर्वेक्षण आणि अन्वेषणाचे काम त्वरित हाती घेण्यात येईल. तसेच यासंबंधित व्यवहार्य योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहेत. अशा एकूण 140 अब्ज घनफूट पाणी वळवण्यासाठीच्या योजनांची निवड जलसंपदा विभागाने प्रस्तावित केली आहे.

तहानलेल्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यास मोठा दिलासा

मराठवाड्यात सातत्याने दुष्काळ पडत आला आहे. येथे पाण्याची नैसर्गिक उपलब्धता कमी असल्याने कोकणातील अतिरिक्त पाणी वळवून मराठवाड्याला दिलासा देणे शक्य आहे. त्यासाठी सविस्तर सर्वेक्षणाअंती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणाऱ्या योजनांना मान्यता देण्याचा आणि त्यांची कामे सुरु करण्याचा निर्णयही घेण्यात आला. कोकणातील नार-पार, दमणगंगा, उल्हास व वैतरणा या खोऱ्यांलगत असलेल्या मराठवाड्यातील गोदावरी नदी खोऱ्यातील पुणे, गंगापूर, वाघाड, करंजवण, भंडारदरा, मुळा, कडवा, मुखणे, भावली इत्यादी धरणांच्या पाणलोट खोऱ्यात हे पाणी वळवता येणार आहे. त्यामार्गे हे पाणी पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणापर्यंत पोहोचेल. तहानलेल्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यास हा मोठा दिलासा असणार आहे.

वैनगंगा खोऱ्यातील 100 अब्ज घनफूट पाणीही वळवणार

पूर्व विदर्भात वैनगंगा खोऱ्यात अतिरिक्त पाणी उपलब्ध आहे. या खोऱ्यातील 100 अब्ज घनफूट पाणी नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी वळवण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी वैनगंगा-नळगंगा नदीजोड योजनेचा अभ्यास करुन सविस्तर प्रकल्प अहवाल राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने तयार केला आहे. त्यानुसार गोसीखुर्द प्रकल्पातून स्थानिक नियोजनावर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच वैनगंगेचे अतिरिक्त वाहून जाणारे 63 अब्ज घनफूट पाणी, अवर्षणप्रवण क्षेत्रात 427 किमी लांबीच्या जोड कालव्याद्वारे प्रवाही पद्धतीने 40 मार्गस्थ साठे भरले जातील. त्यासाठी एकूण 6 उपसा स्थळांतून 155.25 मीटर उंचीपर्यंत उपसा करणे प्रस्तावित आहे.

या प्रकल्पामुळे पूर्व व पश्चिम विदर्भातील पाण्याचे दुर्भीक्ष्य कमी होण्यास मदत होईल आणि आर्थिक व सामाजिक विकासास गती मिळेल. या योजनेतील जोड-कालव्यासाठीचे भूसंपादन टाळण्यासाठी कालव्याऐवजी नलिका किंवा बोगदा प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यासाठी सविस्तर सर्वेक्षण किंवा तांत्रिक अन्वेषनाचे कामही त्वरित हाती घेण्यास आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यास मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मान्यता दिली.

‘नदीजोड प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मुख्य अभियंता’

दमणगंगा-पिंजाळ, नार-पार-गिरणा, पार-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी या नदीजोड प्रकल्पांचे कार्यक्षत्र 3 महामंडळात विभागले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीत समन्वय आणि एकसूत्रीपणा राखण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. ही शक्यता लक्षात घेऊन या नदीजोड प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मुख्य अभियंता कार्यालय स्थापन करणे आवश्यक होते. त्यामुळे मुख्य अभियंता (नदीजोड प्रकल्प) पदाची पदनिर्मिती करुन हे प्रकल्प हाती घेण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे प्रकल्पांची गतिमान अंमलबजावणी करणे शक्य होईल, असे सरकारच्यावतीने सांगण्यात आले.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.