राज्यात सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा, तरुणांनो रक्तदान करा; राजेश टोपेंचं आवाहन

| Updated on: Dec 08, 2020 | 5:19 PM

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे. (Maharashtra Health Minister rajesh tope appeals for blood donations)

राज्यात सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा, तरुणांनो रक्तदान करा; राजेश टोपेंचं आवाहन
Follow us on

जालना: राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे. राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच त्यांनी तरुणांना मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचं आवाहनही केलं आहे. (Maharashtra Health Minister rajesh tope appeals for blood donations)

जालना येथे पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी हे आवाहन केलं आहे. राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. एरव्ही तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर रक्तदान करत असतो. मात्र लॉकडाऊनच्या काळात अनेक महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्था बंद होत्या. त्यामुळे रक्तदान शिबिरं झाली नाही. परिणामी रक्तसाठ्यावर परिणाम झाला. आता आपल्याकडे केवळ पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उरला आहेस, असं टोपे म्हणाले.

पवारांच्या वाढदिवशी रक्तदान करा

येत्या 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तरुण वर्गाने पुढे येऊन रक्तदान करावं. त्यामुळे रक्तसाठ्यातील उणीव भरून काढता येईल, असं त्यांनी सांगितलं.

मेमध्ये रक्ताचा तुटवडा झाला होता

दरम्यान, मे महिन्यातही कोरोनाचं संकट असताना रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. केवळ आठ दिवस पुरेल एवढाच राज्यात रक्तसाठा होता. फक्त कोविड रुग्णांवरील उपचारासाठीच नाही, तर विविध शस्त्रक्रिया, बाळंतपण किंवा कर्करोग, थॅलसेमिया अशा आजारांमध्ये रक्ताची निकड असते. त्यामुळे सोसायट्या, सामाजिक संस्था यांनीही रक्तदान शिबिरं घ्यावी, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केलं होतं. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरं पार पडली होती. आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. (Maharashtra Health Minister rajesh tope appeals for blood donations)

संबंधित बातम्या:

राज्यात आठवडाभर पुरेसाच रक्तसाठा, मंत्री राजेंद्र शिंगणेंकडून रक्तदानाचे आवाहन

दहा दिवस पुरेसाच रक्तसाठा, अंतर राखून रक्तदान करा, राजेश टोपेंची कळकळीची विनंती

 मुंबई-वाशी-दिल्ली पुन्हा नवी मुंबई प्रवास, फिलिपिन्सच्या नागरिकाचा मुंबईत मृत्यू, धाकधूक वाढली

(Maharashtra Health Minister rajesh tope appeals for blood donations)