पुण्यात बिस्कीटाच्या टेम्पोतून गुटख्याची वाहतूक, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गोरखधंदा

| Updated on: Apr 15, 2020 | 4:58 PM

लॉकडाऊनच्या काळातही गुटख्याची तस्करी करणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या कारवाईत 22 लाखांचा गुटखा (Gutkha Smuggling Emergency service tempo) जप्त करण्यात आला.

पुण्यात बिस्कीटाच्या टेम्पोतून गुटख्याची वाहतूक, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गोरखधंदा
Follow us on

पुणे : राज्यात कोरोनाचा विषाणूंचा फैलाव दिवसेंदिवस वाढत (Gutkha Smuggling Emergency service tempo)  आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळातही गुटख्याची तस्करी करणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या कारवाईत 22 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक मानसिंग कुशवाहलाही अट करण्यात आली आहे.

राज्यात गुटखाबंदी असल्याने काही जण इतर राज्यातून (Gutkha Smuggling Emergency service tempo)  आणून त्याची बेकायदेशीर विक्री करत आहे. अनेक जण अत्यावश्यक सेवा देण्याच्या नावाखाली गोरखधंदे करत आहे. नुकतंच अत्यावश्यक सेवेचे स्टिकर लावलेल्या एका टेम्पोतून गुटख्याची वाहतूक सुरु होती.

या टेम्पोच्या मालकाने ऑनलाईन पास मिळला. त्यानंतर या टेम्पोत गुटखा आतील बाजूस भरुन पुढील बाजूस बिस्कीटाचे बॉक्स लावण्यात आले. तेलंगाणामधून पुण्याच्या दिशेने हा टेम्पो निघाला होता. या टेम्पोसमोर अत्यावश्यक सेवा असा बोर्ड लावला होता.

मात्र पोलिसांनी संशय आल्याने या टेम्पोचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी टेम्पो अडवला असता चालकाने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर टेम्पोची झाडाझडती घेतली असता हा प्रकार उघडकीस आला.

यानंतर पोलिसांनी टेम्पो चालक मानसिंग कुशवाहला अटक केली. तसेच त्याच्याकडून कारवाईत 22 लाख 27 हजाराचा गुटखा आणि दहा लाखाचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी मालक शीलदेव रेड्डीवरही गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान यापूर्वीही पुण्यात दूध वाहतूक करणाऱ्या वाहनात बिअरच्या बाटल्या आढळल्या (Gutkha Smuggling Emergency service tempo) होत्या.