Lockdown : लॉकडाऊनमध्ये तळीरामांची पंचाईत, घरात दारु कशी बनवावी?, गुगलवर ट्रेंड

Lockdown : लॉकडाऊनमध्ये तळीरामांची पंचाईत, घरात दारु कशी बनवावी?, गुगलवर ट्रेंड

तळीरामांना दारु मिळणे कठीण झालं आहे. त्यामुळे अनेकांनी दारु मिळवण्यासाठी वेगवेळ्या युक्त्या शोधण्यास सुरुवात केली आहे.

Nupur Chilkulwar

|

Apr 15, 2020 | 3:50 PM

मुंबई : कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आलं आहे. यादरम्यान, (How To Make Alcohol)  मद्यपींची मोठी पंचाईत झाली आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद आहेत. त्यामुळे दारुची दुकानंही बंद आहेत. जर कुठे अवैधरित्या दारुची विक्री होत असेल, तर त्यासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे तळीरामांना दारु मिळणे कठीण झालं आहे. त्यामुळे अनेकांनी दारु मिळवण्यासाठी वेगवेळ्या युक्त्या शोधण्यास (How To Make Alcohol) सुरुवात केली आहे.

घरात दारु कशी बनवावी?, लॉकडाऊनच्या काळात गुगलवर सध्या सर्वात जास्त हे सर्च केलं जात आहे. गुगल ट्रेंडनुसार, 22 ते 28 मार्चदरम्यान लोकांनी गुगलवर जे सर्वाधिक सर्च केलं ते “घरात दारु कशी बनवता येईल”, हे होतं.

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या मते, (How To Make Alcohol) मार्चच्या शेवट-शेवट ग्रे-मार्केटमध्ये दारु दुप्पट किंमतीला विकली जात होती. जेव्हा अवैध विक्री थांबवण्यासाठी दारुच्या दुकानांना सील करण्यात आलं, तेव्हा दारुच्या किंमती आणखी वाढल्या.

सध्या तळीरामांनी बंद असेलेली दारुची दुकानं फोडून दारु चोरी करत आहेत, तर कुठे नशेसाठी सॅनिटायझरचाही वापर करत असल्याचं पुढे आलं आहे.

देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11 हजारांच्या पार केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा काळ 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता तळीरामांच्या समस्या आणखी वाढणार आहेत(How To Make Alcohol) .

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात कुठे काय सुरु आणि काय बंद ?

ऑफिसचे निर्जंतुकीकरण ते वैद्यकीय विमा, ‘कोरोना’ प्रतिबंधासाठी गृह मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे

लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढला, रेल्वे आणि विमान वाहतुकीचं काय?

Lockdown | नरेंद्र मोदींच्या निर्णयाला कॉंग्रेसचे दिग्गज नेते शशी थरुर-चिदंबरम यांचा पाठिंबा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें