लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढला, रेल्वे आणि विमान वाहतुकीचं काय?

नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय रेल्वे आणि नागरी उड्डाण महासंचालनालयाने 3 मेपर्यंत सर्व सेवा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. (Railway Flight services cancelled till Lockdown)

लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढला, रेल्वे आणि विमान वाहतुकीचं काय?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी लॉकडाऊन आणखी 19 दिवसांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यासोबतच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान आणि रेल्वे वाहतूकही 3 मेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. (Railway Flight services cancelled till Lockdown)

देशात 25 मार्चला लॉकडाऊन लागू झाल्यापासून रेल्वे, रस्ते आणि हवाई अशी सर्व प्रकारची वाहतूक 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली होती. 3 एप्रिलला एअर इंडियाने सर्व हवाई उड्डाणांचे बुकिंग 30 एप्रिलपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय रेल्वे आणि नागरी उड्डाण महासंचालनालयाने 3 मेपर्यंत सर्व सेवा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.

‘भारतीय रेल्वेवरील सर्व प्रीमियम गाड्या, मेल/एक्स्प्रेस गाड्या, पॅसेंजर गाड्या, उपनगरी गाड्या, कोलकाता मेट्रो रेल्वे, कोकण रेल्वे इत्यादींसह सर्व प्रवासी रेल्वेसेवा 3 मे 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत रद्द राहतील.’ असं ट्वीट रेल्वे मंत्रालयाने केलं आहे.

मालवाहतूक गाड्या:

देशाच्या विविध भागात आवश्यक पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी वस्तू आणि पार्सल गाड्यांची वाहतूक कायम राहील.

तिकिटे रद्द करणे:

अनारक्षित आणि प्रवासी आरक्षण केंद्रातील सर्व तिकिट काउंटर पुढील आदेश होईपर्यंत बुकिंगसाठी निलंबित (बंद) राहतील. पुढील आदेशांपर्यंत ई-तिकिटांसह गाड्यांच्या तिकिटांचे आगाऊ आरक्षण होणार नाही. परंतु ऑनलाइन रद्द करण्याची सुविधा कार्यरत राहील. पुढील आदेश येईपर्यंत 3 मे नंतरच्या ई तिकिटांसह कोणत्याही प्रकारची बुकिंग केली जाणार नाही.

परतावा: 

रद्द केलेल्या गाड्यांच्या आरक्षणासाठी संपूर्ण परतावा मिळेल. अद्याप रद्द न झालेल्या गाड्यांच्या तिकिटांचे आगाऊ आरक्षण रद्द करणा-यांना देखील पूर्ण परतावा मिळेल. 3 मे 2020 पर्यंत रद्द करण्यात आलेल्या गाड्यांच्या ऑनलाइन तिकीटांचा परतावा रेल्वेमार्फत ग्राहकांना ऑनलाईन स्वयंचलितपणे पाठविला जाईल. ज्यांनी काउंटरवर तिकीट बुक केले आहेत, ते 31 जुलै 2020 पर्यंत परतावा मिळवू शकतील.

अधिक माहितीसाठी: www.indianrailways.gov.in, www.irctc.co.in आणि www.cr.indianrailways.gov.in वर लॉग इन करावे.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सर्व  नियोजित विमानसेवा 3 मे 2020 रोजी रात्री 11: 59 पर्यंत रद्द करण्यात आल्याचं ‘डीजीसीए’ने जाहीर केलं. यामध्ये आंतरराष्ट्रीय कार्गो विमानांना सूट देण्यात आलेली आहे

सुरुवातीला, 22 मार्चपासून एका आठवड्यासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे थांबवण्यात आली होती. 25 मार्चला लॉकडाऊन सुरु झाल्यापासून देशांतर्गत उड्डाणासोबतच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकही 15 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती.

हेही वाचा : …तर 20 एप्रिललाच तुम्हाला ‘लॉकडाऊन’मध्ये सशर्त सूट मिळेल

(Railway Flight services cancelled till Lockdown)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *