AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑफिसचे निर्जंतुकीकरण ते वैद्यकीय विमा, ‘कोरोना’ प्रतिबंधासाठी गृह मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे

शाळा, कॉलेज, खासगी कोचिंग क्लासेस, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विमानसेवा, रेल्वे सेवा बंद ठेवण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत. (HMO India issues consolidated revised Guidelines for COVID19)

ऑफिसचे निर्जंतुकीकरण ते वैद्यकीय विमा, 'कोरोना' प्रतिबंधासाठी गृह मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे
| Updated on: Apr 15, 2020 | 11:24 AM
Share

नवी दिल्ली : ‘लॉकडाऊन 2’च्या पार्श्वभूमीवर ‘कोरोना’ प्रतिबंधासाठी गृह मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे दंडनीय अपराध असेल. (HMO India issues consolidated revised Guidelines for COVID19)

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा 3 मेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा, कॉलेज, खासगी कोचिंग क्लासेस, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विमानसेवा, रेल्वे सेवा बंद ठेवण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत.

सर्व कार्यालये, फॅक्टरी आणि इतर संस्थांनी खालील सूचना पाळाव्यात

1. निर्जंतुकीकरण – कार्यालय, इमारत यांचे प्रवेशद्वार, कँटीन आणि कॅफेटेरिया, मीटिंग रुम, कॉन्फरन्स रुम, मोकळ्या जागा, वरांडा, लिफ्ट, स्वच्छतागृह, पाणी पिण्याच्या जागा, भिंती यांचे निर्जंतुकीकरण करावे

2. सार्वजनिक वाहतुकीऐवजी कर्मचाऱ्यांना वेगळी व्यवस्था करावी. या वाहनात 30 ते 40 टक्के प्रवासीच असतील याची काळजी घ्यावी

3. परिसरात प्रवेश करणाऱ्या वाहन आणि मशिनरीचे निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य आहे.

4. कार्यालयात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल स्क्रीनिंग करणे बंधनकारक असेल

5. कामगारांचा वैद्यकीय विमा उतरवणे अनिवार्य

6. प्रवेशद्वाराजवळ स्पर्शविरहित हात धुण्याची आणि सॅनिटायझरची व्यवस्था. त्याचा मुबलक साठा असावा

7. दोन शिफ्टमध्ये एक तासाचे अंतर ठेवावे. सोशल डिस्टन्सिंग पाळून कर्मचाऱ्यांना भोजन घेण्यास सांगावे

8. मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांच्या मीटिंग टाळाव्यात. किमान सहा फूट अंतर राखून जास्तीत जास्त दहा जण सहभागी व्हावेत

9. 65 वर्षांवरील व्यक्ती आणि पाच वर्षांखालील मुलांच्या आई-वडिलांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा द्या

10. खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना आरोग्यासेतू अॅप डाऊनलोड करण्यास सांगावे

3 मेपर्यंत कशाकशावर बंदी? (HMO India issues consolidated revised Guidelines for COVID19)

क्रीडा स्पर्धा व इतर कार्यक्रम जिम क्रीडा संकुल जलतरण तलाव राजकीय कार्यक्रम सर्व प्रार्थनास्थळे धार्मिक कार्यक्रम सर्व सामाजिक उपक्रम चित्रपटगृहे शॉपिंग मॉल्स बार हॉटस्पॉटच्या ठिकाणी सूट नाही कंटेनमेंट झोनलाही सूट नाही

वाहतूक, दळणवळण 3 मेपर्यंत बंदच

आंतर-राज्य दळणवळण आंतर-जिल्हा दळणवळण मेट्रो सेवा बस सेवा रेल्वे सेवा देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा

(HMO India issues consolidated revised Guidelines for COVID19)

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.