महाराष्ट्र पोलीस दलाला कोरोनाचा विळखा, पाच दिवसात 329 पोलिसांना संसर्ग

महाराष्ट्राच्या पोलीस विभागातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस (Maharashtra Police Corona Cases) वाढ होत आहे.

महाराष्ट्र पोलीस दलाला कोरोनाचा विळखा, पाच दिवसात 329 पोलिसांना संसर्ग
| Updated on: May 10, 2020 | 1:09 PM

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे (Maharashtra Police Corona Cases) महाराष्ट्र पोलीस दलालाही कोरोनाने विळखा घातला आहे. गेल्या पाच दिवसात तब्बल 329‬ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 786 वर पोहोचला आहे.

महाराष्ट्र पोलीस विभागातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस (Maharashtra Police Corona Cases) वाढ होत आहे. आज एका दिवसात 72 पोलिसांचा रिपोर्ट कोरोना पाॉझिटिव्ह आला आहेत. तर काल 96 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा हा 786 वर गेला आहे.

यात 88 अधिकारी आणि 698 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे लागण झालेल्यांमध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. जवळपास 75 अधिकारी आणि 628 पोलीस कर्मचारी अशा एकूण 703 पोलिसांमध्ये कोरोनाची लक्षण दिसत आहे.

पोलिसांना कोरोनाचा विळखा

  • रविवार 10 मे – 72
  • शनिवार 9 मे – 96
  • शुक्रवार 8 मे – 87
  • गुरुवार 7 मे – 36
  • बुधवार 6 मे – 38

सुदैवाने यातील 13 अधिकारी आणि 63 पोलीस कर्मचारी असे एकूण 76 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुर्देवाने आतापर्यंत 7 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊनमध्ये गुन्हेगारीत वाढले

राज्यात संचारबंदीच्या काळात 1 लाख, 1 हजार 245 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 19 हजार 513 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय जवळपास  55 हजार 650 वाहन जप्त करण्यात आली आहेत.

राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का असलेल्या 660 व्यक्तींना शोधून विलगीकरम कक्षात पाठवलं आहे.
तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या 1291 वाहनांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कालावधीत आरोपींकडून 3 कोटी 82 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर राज्यभरात डॉक्टर आणि इतर वैद्यकीय सेवकांवर हल्ल्याच्या 32 घटना घडल्या (Maharashtra Police Corona Cases) आहेत.
संबंधित बातम्या :
काल 87, आज 96 पोलिसांना कोरोना, आतापर्यंत 714 पोलीस कोरोनाबाधित
Nashik Corona Update | नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता कहर, मालेगावातील आकडा 500 च्या उंबरठ्यावर