सोन्याच्या मुकुटासह केदारनाथचे महास्वामी नांदेडमध्ये अडकून, कपाट उघडण्याचा मुहूर्त तोंडावर, उत्तराखंडला जाण्याच्या हालचाली

| Updated on: Apr 16, 2020 | 8:21 PM

लॉकडाऊनमुळे उत्तराखंडच्या केदारनाथ येथील उखी मठचे भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी (Mahaswami of  Kedarnath) सध्या नांदेडमध्ये अडकले आहेत.

सोन्याच्या मुकुटासह केदारनाथचे महास्वामी नांदेडमध्ये अडकून, कपाट उघडण्याचा मुहूर्त तोंडावर, उत्तराखंडला जाण्याच्या हालचाली
Follow us on

नांदेड : लॉकडाऊनमुळे उत्तराखंडच्या केदारनाथ येथील उखी मठचे भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी (Mahaswami of Kedarnath) सध्या नांदेडमध्ये अडकले आहेत. महास्वामींच्याहस्ते अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर केदारनाथ मंदीराचे कपाट उघडण्यात येणार आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे ते महाराष्ट्रात अडकले आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यांना त्यांच्या तीन सहकाऱ्यांसह उत्तराखंडला जाण्याची परवानगी दिली आहे. पण चार राज्य ओलांडून जायचे असल्यामुळे महास्वामी केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतिक्षा करत आहेत (Mahaswami of Kedarnath).

केदारनाथ मंदिराचे कपाट दरवर्षी दिपावलीला बंद होते. हे कपाट अक्षय तृतीयाच्या दिवशी उघडण्यात येते. यावेळी धार्मिक विधी पार पडतो. या दोन्ही दिवसांचे विधी महास्वामी यांच्याहस्तेच संपन्न होतात. दिवाळीला कपाट बंद झाल्यानंतर केदारनाथ यांच्या डोक्यावर असणारा सोन्याचा मुकूट महास्वामींकडे असतो. महास्वामींकडे हा मुकूट सहा महिने असतो. अक्षय तृतीयाला कपाट उघडल्यानंतर हा मुकूट पुन्हा एकदा केदारनाथांच्या मुर्तीवर विधीवत ठेवला जातो. यामुळे भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांना अनन्यसाधारण असं महत्व आहे.

या सोहळ्यास जाण्यासाठी महास्वामींनी सर्व तिकिटे याआधीच आरक्षित केली होती. मात्र, कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं. अशावेळी निर्माण झालेल्या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन त्यांना प्रवास परवाना मिळवून दिला. मात्र, महास्वामी केंद्र सरकारच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत.

दरम्यान, “2013 साली झालेल्या बर्फवृष्टी नंतरही आम्ही तातडीने सावरलो होतो, त्यामुळे यंदाही हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडेल”, असा विश्वास महास्वामींनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

Corona : रस्त्यावर 200, 500 च्या नोटा, परिसरात दहशत, कुणी हात लावायलाही तयार नाही

चिमुकल्यापासून आजीबाईंपर्यंत कोरोनाशी यशस्वी लढा, राज्यात कोठे किती रुग्ण बरे?