महेश कोठारेंच्या घरावर ‘स्पेशल 5’ च्या टीमचा छापा

मुंबई : अनेक सिनेमांमध्ये पोलिसांच्या भूमिकेत दिसलेले सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या घरावरच छापा मारण्यात आला. हा छापा दुसरा-तिसरा कुणी नाही, तर स्पेशल 5 च्या टीमने मारला. होय, स्पेशल 5 ची टीम, जी स्टार प्रवाहवर नव्या क्राईम शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या छाप्यासाठी कारणीभूत ठरली महेश कोठारे यांची प्रसिद्धी. ऐकून आश्चर्य वाटत […]

महेश कोठारेंच्या घरावर 'स्पेशल 5' च्या टीमचा छापा
Follow us
| Updated on: Feb 15, 2020 | 6:12 PM

मुंबई : अनेक सिनेमांमध्ये पोलिसांच्या भूमिकेत दिसलेले सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या घरावरच छापा मारण्यात आला. हा छापा दुसरा-तिसरा कुणी नाही, तर स्पेशल 5 च्या टीमने मारला. होय, स्पेशल 5 ची टीम, जी स्टार प्रवाहवर नव्या क्राईम शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या छाप्यासाठी कारणीभूत ठरली महेश कोठारे यांची प्रसिद्धी. ऐकून आश्चर्य वाटत असलं तरी हे खरं आहे. महेश कोठारे यांना आपण बऱ्याच सिनेमांमध्ये धडाकेबाज पोलिस इन्सपेक्टरच्या भूमिकांमध्ये पाहिलंय. त्यांचा सळसळता उत्साह तरुणाईला नवी ऊर्जा देतो. महेश कोठारेंच्या या एनर्जीमागे नेमकं काय रहस्य आहे, हेच जाणून घेण्यासाठी ‘स्पेशल 5’ च्या टीमने त्यांच्या घरावर छापा टाकला. ‘स्पेशल 5’ ची ही टीम स्टार प्रवाहवरील नव्या क्राईम शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं म्हणत देशाची सेवा करण्याचा यांनी वसा घेतलाय. म्हणूनच तर पाच जिगरबाज पोलिसांची ही टीम खऱ्या अर्थाने स्पेशल आहे. महेश कोठारेंसोबत रंगलेल्या मनसोक्त गप्पांमधून ‘स्पेशल 5’ च्या टीमला बऱ्याच टीप्स मिळाल्या आणि ही भेट खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरली. ‘स्पेशल 5’ टीमची शौर्यगाथा अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना आता फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. 10 डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता स्टार प्रवाहवर हा शो पाहता येणार आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.