रायगड बघायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला, पुण्यातील 9 जणांचा जागीच मृत्यू

इर्टिका आणि ट्रकमध्ये धडक होऊन पुण्यातील लोणीकाळभोर जवळ भीषण अपघात झाला. यात 9 महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

रायगड बघायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला, पुण्यातील 9 जणांचा जागीच मृत्यू
| Updated on: Jul 20, 2019 | 11:22 AM

पुणे:  लोणीकाळभोरजवळ भीषण अपघातात पुण्यातील 9 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पुणे सोलापूर महामार्गावर अर्टिगा आणि ट्रकमध्ये भीषण धडक होऊन मध्यरात्री एकच्या सुमारास हा थरारक अपघात झाला. वीकेंडनिमित्त सर्वजण पावसाळी पिकनिकसाठी रायगडला निघाले होते, त्यावेळी त्यांच्यावर काळाने झडप घातली. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.

अर्टिगा कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली. कदम वाकवस्ती (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन वाहनांची  समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी मोठी होती की कारमध्ये प्रवास करणाऱ्या 9 महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमधील सर्वजण यवत (ता. दौंड) परिसरातील आहेत. हा अपघात रात्री 1 वाजेच्या सुमारास झाला. सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी रायगडला फिरायला गेले होते. अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव आणि जुबेर अजिज अशी मृतांची नावे आहेत. लोणी काळभोर पोलीस अपघाताचा अधिक तपास करत आहेत.