लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणं बलात्कारच : सुप्रीम कोर्ट

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

नवी दिल्ली : “लग्नाचं आमिष दाखवून महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणं बलात्कार आहे, असं केल्याने महिलेच्या सन्मानाला धक्का लागतो”, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि एमआर शाह यांच्या खंडपीठाने एका खटल्यावरील सुनावणी दरम्यान हा निर्णय दिला. “लग्नाचं आमिष दाखवून महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणारा, बलात्कार करणारा आरोपी आपल्या जीवनात पुढे निघून जातो, […]

लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणं बलात्कारच : सुप्रीम कोर्ट
Follow us on

नवी दिल्ली : “लग्नाचं आमिष दाखवून महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणं बलात्कार आहे, असं केल्याने महिलेच्या सन्मानाला धक्का लागतो”, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि एमआर शाह यांच्या खंडपीठाने एका खटल्यावरील सुनावणी दरम्यान हा निर्णय दिला.

“लग्नाचं आमिष दाखवून महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणारा, बलात्कार करणारा आरोपी आपल्या जीवनात पुढे निघून जातो, ही घटना विसरुन आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतो. पण याचा अर्थ हा नाही की त्याच्याकडून गुन्हा झालेला नाही. त्याच्या वागणुकीला नेहमी गुन्हाच समजलं जाईल”, असंही न्यायालयाने म्हटलं.

छत्तीसगडमधील डॉक्टरने महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर तिची फसवणूक केली. याप्रकरणी न्यायालयात खटला सुरु आहे. अशा प्रकारची फसवणूक करणे म्हणजे बलात्कारच, असे या खटल्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केलं.

“अशा घटना आधुनिक समाजात वेगाने वाढत आहेत. या घटनांमुळे महिलेच्या आत्मसन्मानाला ठेच लागते. त्यामुळे अशाप्रकारे महिलांच्या भावनांशी खेळ करणे, त्यांना अंधारात ठेवून त्यांचा फायदा उचलणे हा गुन्हा आहे”, असंही न्यायालयाने सांगितलं.

प्रकरण काय?

छत्तीसगडच्या एका महिलेने 2013 ला एका डॉक्टराविरोधात बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या डॉक्टरने महिलेला लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. याची त्यांच्या कुटुंबांनाही माहिती होती. मात्र, त्यानंतर डॉक्टरने पीडित महिलेला न सांगता दुसऱ्या महिलेशी साखरपुडा केला आणि पीडित महिलेशीही प्रेम संबंध ठेवले. त्यानंतर डॉक्टरने दुसऱ्या महिलेशी लग्न केलं. तेव्हा पीडित महिलेला फसवणूक झाल्याचं समजलं. त्यानंतर तिने डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली.

VIDEO :