Malegaon Corona Update | मालेगावला कोरोनाचा विळखा, पाच दिवसात 152 रुग्णांची वाढ

| Updated on: May 05, 2020 | 5:03 PM

सद्यस्थितीत मालेगावात 334 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यातील 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 जणांना डिस्चार्ज मिळाला (Malegaon Corona Patient Increase) आहे.

Malegaon Corona Update | मालेगावला कोरोनाचा विळखा, पाच दिवसात 152 रुग्णांची वाढ
Follow us on

नाशिक : उत्तर महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर हे (Malegaon Corona Patient Increase) कोरोनाचे  हॉटस्पॉट ठरलं आहे. मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज (5 मे) पर्यंत मालेगाव शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 334 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या पाच दिवसात 152 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

मालेगाव शहरात 8 एप्रिलपर्यत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र (Malegaon Corona Patient Increase) त्यानंतर 8 एप्रिलला 5 रुग्ण आढळले आहेत. त्याच दिवशी एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर मालेगावात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले. सद्यस्थितीत मालेगावात 334 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यातील 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

सुरुवातीला शहराच्या पूर्व भागात वाढत असलेल्या कोरोनाने पश्चिम भागात ही आपले पाय पसरवण्यात सुरुवात केली. सध्या शहराच्या दोन्ही भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. त्यामुळे शहरातील 55 भाग हे कंटेन्मेट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या भागात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या भागातील नागरिकांना बाहेर जाण्यास तर बाहेरील व्यक्तींना आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

गेल्या 6 दिवसात कोरोना रुग्णांमध्ये झालेली वाढ पुढीलप्रमाणे

दिनांक – रुग्णसंख्या (एका दिवसातील वाढ)

29 एप्रिल – 182 (0)
30 एप्रिल – 258 (76)
1 मे – 275 (17)
2 मे – 298 (23)
3 मे – 326 (28)
4 मे – 334 (08)

मालेगावमधील हॉटस्पॉट

1) मोमीनपुरा
2) कमालपुरा
3) नयापुरा
4) नूरबाग
5) इस्लामपुरा
6) आपण सुपर मार्केट एरिया
7) संगमेश्वर भाग
8) सिद्धार्थ नगर
9) गुलाब पार्क

मालेगावात पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शहरात बंदोबस्तासाठी इतर ठिकाणाहून आलेल्या SRPF जवानांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मालेगाव शहरात असलेला कोरोनाने ग्रामीण भागातही आपले पाय पसरू लागला आहे. या तालुक्यातील दाभाडी येथे कोरोनाचे 8 रुग्ण सापडले आहे. त्यामुळे वाढता कोरोना रोखण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेसह प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

संबंधित बातम्या : 

हिंगोलीत ‘कोरोना’ रुग्णसंख्येचा स्फोट, 24 तासात 37 SRPF जवानांना लागण, रुग्णसंख्या 90 वर

अकोल्यात एकाच दिवसात कोरोनाचे 11 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 75 वर

भवानी पेठेत चारशेपार कोरोनाग्रस्त, ढोले पाटील रोडवर 314 रुग्ण, पुण्यात कोणत्या प्रभागात किती?