MPSC च्या परीक्षेत ‘ग्रुप कॉपी’, अधिकारी होण्यासाठी ‘अवैध राजमार्ग’

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

पुणे : दहावी, बारावीच्या परिक्षातील कॉपीचे वेगवेगळे पॅटर्न ‘कुप्रसिद्ध’ आहेत. मात्र, आता या पॅटर्नला मागं टाकणारा हायटेक सामूहिक कॉपीचा पॅटर्न समोर आला आहे आणि तोही चक्क अधिकारी होण्यासाठी. एमपीएससीच्या परिक्षार्थींनी मास कॉपी करुन आयोगाला गंडवल्याचं उघड झालं आहे. ग्रुपने मोबाईल सीमकार्ड खरेदी करुन एकापाठोपाठ आसन व्यवस्थेची सोय करत, सामूहिक कॉपी केली आहे. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक, […]

MPSC च्या परीक्षेत ‘ग्रुप कॉपी’, अधिकारी होण्यासाठी ‘अवैध राजमार्ग’
Follow us on

पुणे : दहावी, बारावीच्या परिक्षातील कॉपीचे वेगवेगळे पॅटर्न ‘कुप्रसिद्ध’ आहेत. मात्र, आता या पॅटर्नला मागं टाकणारा हायटेक सामूहिक कॉपीचा पॅटर्न समोर आला आहे आणि तोही चक्क अधिकारी होण्यासाठी. एमपीएससीच्या परिक्षार्थींनी मास कॉपी करुन आयोगाला गंडवल्याचं उघड झालं आहे. ग्रुपने मोबाईल सीमकार्ड खरेदी करुन एकापाठोपाठ आसन व्यवस्थेची सोय करत, सामूहिक कॉपी केली आहे.

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक, नायब तहसीलदार आणि उपशिक्षणाधिकारी वर्ग एक आणि दोनचे राजपत्रित अधिकारी, ही सारी प्रशासनातील  मान सन्मान आणि प्रतिष्ठेची पदं. मात्र ही पदं मिळवण्यासाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आयोगाला गंडवलंय. समूहानं मोबाईल सीम कार्ड खरेदी करुन एकापाठोपाठ आसन व्यवस्था केली. अख्खा ग्रुपच एकापाठोपाठ आल्यानं  सामूहिक कॉपी करुन पास होण्याचा राजमार्ग गवसला. भावी राजपत्रित अधिकाऱ्यांच्या राजमार्गानं खळबळ उडालीय.

ऑक्टोबर 2018 साली तालुका आणि जिल्हा कृषी अधिकारी पदाची परिक्षा झाली. वर्ग एक आणि दोनच्या चारशे जागांसाठी ही परीक्षा झाली. शुक्रवारी या परीक्षेचा निकाल लागला. मात्र निकाल पाहताच गोलमाल झाल्याचं दिसून येतंय. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परिक्षार्थींच्या यादीवर एक नजर मारल्यास घोटाळा उघडकीस येतोय. एकापाठोपाठ आसन व्यवस्था असलेले परिक्षार्थी उत्तीर्ण झालेत. साधारण 45 टक्के उत्तीर्ण विद्यार्थी सलग बैठक व्यवस्था असलेले आहेत.

  • औरंगाबाद जिल्ह्यात तर एकापाठोपाठ आलेले तब्बल सहा जण उत्तीर्ण झालेत.शेवटी बारा क्रमांकापासून आठरा क्रमांकापर्यंत सर्वजण उत्तीर्ण झालेत. AU001412, 1413,1414,1415,1417,1418, AU001133,1134,1135,1136 यांचा उत्तीर्णांमध्ये समावेश आहे.
  • पुण्यात एका पाठोपाठ आसन व्यवस्था असलेले सात जण उत्तीर्ण झालेत. शेवटच्या 72 क्रमांकापासून 74 पर्यंत उत्तीर्ण झालेत. PN001272, 1273,1274, PN001350,1351,1352,1353 यांचा उत्तीर्णांमध्ये समावेश आहे.

आयोगानं एमपीएससी परीक्षेसाठी मोबाईल सीम कार्ड क्रमांकावरुन आसन व्यवस्था ठरवली आहे.  2017-18 पासून याबाबतचा अध्यादेश काढण्यात आलाय. मोबाईल नंबर एमपीएससीच्या प्रोफाईल किंवा खात्यावर नोंदणी करावा लागतो. मात्र हीच संधी मानत आनेक संधीसाधूंनी आपलं उखळ पांढरं करुन घेतलंय. ग्रुपने सलग क्रमांकाचे मोबाईल सीम खरेदी करा आणि एमपीएससीच्या परिक्षेत एकापाठोपाठ बैठक क्रमांक मिळवा, ही ‘अभिनव योजनाच’ सुरु झाली.

कृषी विभागाच्या एक आणि दोनच्या पदांचा निकाल लागला आहे. मात्र आता 17 फेब्रुवारीला राज्य सेवा पूर्व परिक्षा होणार आहे. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक, नायब तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी वर्ग एक आणि वर्ग दोनचे राजपत्रित अधिकारी निवडले जाणार आहेत. 360 जागांसाठी परीक्षार्थींचे  प्रवेशपत्र आलेत. या परीक्षांसाठीही ग्रुपने मोबाईल सीम खरेदी करुन एकापाठोपाठ आसन व्यवस्थेची सोय केल्याची शंका आहे. त्यामुळे आता अनेक परीक्षार्थी हॉल तिकीटच दाखवत नाहीत.

एमपीएससीच्या अभ्यासासाठी विद्यार्थी क्लासेस लावतात. ग्रामीण भागात सोय नसल्यानं अनेकजण शहरात अभ्यासिका लावतात. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी अधिकारी होण्यासाठी झोकून देतात. दिवस-रात्र मिळेल ते खात अभ्यास करतात. अशा परिस्थितीत काहींनी शॉर्टकट शोधल्यानं प्रामाणिक परीक्षार्थींवर संकट कोसळलं आहे. अभ्यास सोडून आम्ही रस्त्यावर तर उतरु शतक नाही. मात्र आयोगानं मोबाईल सीम कार्डची आसन व्यवस्था रद्द करावी आणि जन्म तारीख किंवा आधार कार्ड आसन व्यवस्था करण्याची मागणी केलीय.

एमपीएससीच्या परीक्षार्थींच्या या सामूहिक कॉपी प्रकरणी काही विद्यार्थ्यांनी आयोगाला मेल केलाय. तर काही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मेल करुन कळवलंय. मात्र, अद्याप यावर काहीच प्रतिसाद न मिळाल्यानं विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत.