पुतिन यांच्या दौऱ्यानंतर भारताला बंपर लॉटरी, आता या बलाढ्य देशाकडून सर्वात मोठी घोषणा, पहिल्यांदाच असं घडतंय
मोठी बातमी समोर येत आहे, पुतिन यांच्या भारत दौऱ्यानंतर आता भारताला आणखी एक मोठी गुडन्यूज मिळाली आहे. पुतिन यांच्या भारत दौऱ्यामध्ये रशिया आणि भारतामध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले, त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते. शुक्रवारी भारत आणि रशियामध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले. ज्यामध्ये एक महत्त्वाचा करार म्हणजे आता भारतीय कामगारांना रशियामध्ये जाऊन काम करता येणार आहे, यामुळे भारतामधील बेरोजगारी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.पुतिन भारताच्या दौऱ्यावर असतानाच त्यांनी मोठी घोषणा केली आहे, ती म्हणजे रशिया भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीच कच्च्या तेलाची कमी पडू देणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. खरं पहाता हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण अमेरिकेचा असा दावा आहे की, भारत रशियाकडून खरेदी करत असलेल्या तेलामुळे रशियाला युक्रेनविरोधातील युद्धात फंड उभारण्यासाठी मदत होत आहे.
त्यामुळेच भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये म्हणून अमेरिकेकडून दबाव निर्माण केला जात आहे, याचाच परिणाम म्हणून अमेरिकेनं भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे. मात्र त्यानंतर आता पुतिन यांनी ही मोठी घोषणा केली आहे, भारताला तेलाची कमी पडू देणार नाही, असं रशियानं म्हटलं आहे. तसेच भविष्यात भारताला रशिया आणखी स्वस्त दरानं तेल उपलब्ध करून देण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता भारतासाठी आणखी एक गुड न्यूज समोर आली आहे.
ती म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ दे पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज (OPEC) चा सदस्य असलेल्या सौदी अरेबियानं आता मोठी घोषणा केली आहे. सौदी अरेबियानं मोठा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियानं आशियामधील देशांसाठी आपल्या कच्च्या तेलाच्या किमती कमी केल्या आहेत. गेल्या पाच वर्षांमधील हे दर सर्वात कमी आहेत. रॉयटर्सच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, सौदी अरेबियानं आशियामधील देशांसाठी आपल्या कच्च्या तेलाच्या किमती गेल्या पाच वर्षांमधील सर्वात निचांकी स्थरावर आणल्या आहेत. ज्याचा फायदा हा भारत, चीन या देशांसह आशियामधील सर्वच देशांना होणार आहे. त्यामुळे भविष्यात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
