AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BAN vs PAK : बांगलादेश-पाकिस्तान अंतिम सामना, भारतात किती वाजता पाहता येणार? जाणून घ्या

Bangladesh vs Pakistan 3rd Odi Live Streaming : पाकिस्तानला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत काही खास करता आलं नाही. त्यामुळे पाकिस्तानचा बांगलादेश दौऱ्यातील शेवटच्या एकदिवसीय मालिकेत विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.

BAN vs PAK : बांगलादेश-पाकिस्तान अंतिम सामना, भारतात किती वाजता पाहता येणार? जाणून घ्या
BAN vs PAKImage Credit source: ACC
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 14, 2026 | 10:56 PM
Share

पाकिस्तान क्रिकेट टीम भारत आणि श्रीलंकेत आयोजित करण्यात आलेल्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत अपयशी ठरली. पाकिस्तानला आशिया खंडात आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धा असूनही उपांत्य फेरीपर्यंतही पोहचता आलं नाही. आशिया खंडात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याने पाकिस्तानसाठी अनुकूल स्थिती होती. मात्र पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचण्यात अपयश आलं. पाकिस्तान टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेनंतर सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. बांगलादेश मायदेशात पाकिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात मालिका विजेता कोण असणार? याची प्रतिक्षा लागून आहे. या निमित्ताने उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना कधी आणि कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना कधी?

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना रविवारी 15 मार्च रोजी होणार आहे.

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना कुठे?

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना ढाक्यातील शेरे बांगला नॅशनल क्रिकेट स्टेडयिममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होईल. तर त्याआधी 1 वाजून 15 मिनिटांनी टॉस होईल.

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान तिसरा आणि अंतिम एकदिवसीय टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही.

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान तिसरा आणि अंतिम एकदिवसीय  क्रिकेट सामना मोबाईलवर फॅनकोड एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

बांगलादेशसमोर माज सदाकतला रोखण्याचं आव्हान

दरम्यान बांगलादेशसमोर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ओपनर बॅट्समन माज सदाकत याला रोखण्याचं आव्हान असणार आहे. पाकिस्तानने बांगलादेशवर दुसऱ्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला होता. या विजयाचा माज हा शिल्पकार ठरला होता. माजने त्या सामन्यात अर्धशतकी खेळी आणि 3 विकेट्स मिळवल्या होत्या. त्यामुळे माजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात बांगलादेशला जिंकायचं असेल तर पाकिस्तानच्या या ओपनरला रोखावं लागेल.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल