AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन अभिनेत्रींना वेश्या व्यवसायात ढकलतात… बॉलिवूडमधील काळं सत्य समोर, अभिनेत्रीच्या खुलाशाने खळबळ

Bollywood : एका प्रसिद्ध अभिनेत्रीने खळबळजनक खुलासा केला आहे. तिने मनोरंजन क्षेत्रातील डार्क साइड बद्दल बोलत नव्या कलाकारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

नवीन अभिनेत्रींना वेश्या व्यवसायात ढकलतात... बॉलिवूडमधील काळं सत्य समोर, अभिनेत्रीच्या खुलाशाने खळबळ
dark reality of film industryImage Credit source: Google
| Updated on: Mar 14, 2026 | 10:27 PM
Share

बॉलिवूडमधील काळ सत्य समोर आलं आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने खळबळजनक खुलासा केला आहे. बेधडक बोलणाऱ्या या अभिनेत्रीने मनोरंजन क्षेत्रातील डार्क साइड बद्दल बोलत नव्या कलाकारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तनुश्रीच्या मते बॉलिवूडमध्ये अनेकदा नवोदित कलाकारांना मॅनिप्युलेशन, शोषण आणि संधी देण्याच्या खोट्या आश्वासनांद्वारे जाळ्यात ओढले जाते. अनेक नव्या लोकांना गोड बोलून इंडस्ट्रीत आणले जाते आणि नंतर त्यांना विचित्र किंवा शोषणात्मक परिस्थितीत अडकवले जाते. तनुश्रीने नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

तनुश्री दत्ता नेमकं काय म्हणाली?

तनुश्री दत्ताने मेरी सहेली सोबतच्या पॉडकास्टमध्ये म्हटले की, ‘कोणी तरी म्हणतं, तुम्ही खूप हँडसम आहात, खूप सुंदर आहात, तुम्ही नक्की हिरो किंवा हिरोईन व्हाल. टॅलेंट आहे की नाही हे नंतर बघितलं जातं, पण अशी स्तुती करून लोकांना वर चढवलं जातं. पण जास्त स्तुती ही एक सापळा ठरू शकते. नवोदित कलाकार अनेकदा अशा लोकांनी वेढलेले असतात जे त्यांची सतत प्रशंसा करतात आणि हळूहळू त्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकू लागतात.

काहींना वेश्या व्यवसायात ढकलले जाते

तनुश्री दत्ता यांनी उदाहरण देत सांगितले की, ‘लहानपणी पालक सांगतात की अनोळखी लोकांपासून सावध राहा. कोणी चॉकलेट दाखवलं तर त्याच्यासोबत जाऊ नका. पण इंडस्ट्रीत चॉकलेट वेगळ्या प्रकारचं असतं. लोक तुमच्या आशा आणि स्वप्नांचा वापर करतात आणि त्यांच्याशी खेळतात. खूप लोक इथे येतात, त्यांचा वापर केला जातो, त्यांच्यावर अत्याचार होतात आणि नंतर त्यांना टाकून दिलं जातं. काही जणांना तर वेश्या व्यवसायातही ढकललं जातं. यामुळे काही लोक मानसिकदृष्ट्या इतके तुटून जातात की ते आपापल्या शहरात परत जातात.’

नवोदित कलाकारांना इशारा

तनुश्री दत्ता म्हणाल्या की, मी या विषयांवर सार्वजनिकपणे बोलतो कारण इंडस्ट्रीत नाव आणि यश मिळवण्याचे स्वप्न घेऊन येणाऱ्या तरुणांना सावध करणे हे माझे उद्दिष्ट आहे. जर मला बोलण्यासाठी मंच मिळाला आहे आणि माझ्या बोलण्यामुळे चार जणांचं आयुष्य वाचलं, तरी ते माझ्यासाठी खूप मोठं आहे. अशा कथा फार कमी लोकांपर्यंत पोहोचतात, कारण मनोरंजन उद्योगात फक्त यशाच्या कथाच पुढे आणल्या जातात.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....