AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत पहाटेपासून पावसाची जोरदार हजेरी, 30-40 ताशी वेगाने वारे वाहणार, पुढचे 3 तास…

Monsoon Update Mumbai : राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाला सुरूवात झाली. मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला.

मुंबईत पहाटेपासून पावसाची जोरदार हजेरी, 30-40 ताशी वेगाने वारे वाहणार, पुढचे 3 तास...
Mumbai Rain
| Updated on: Jun 22, 2026 | 7:57 AM
Share

अखेर अनेक दिवसांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली. पहाटेपासूनच पावसाला सुरूवात झाली. या पावसाने रस्त्यावर पाणी साचले. सकाळी कामाला निघालेल्या अनेक जणांची तारांबळ उडाली. आज राज्यभरात पावसाला पोषक वातावरण आहे. मॉन्सून लांबणीवर पडलेला असतानाच दमदार पाऊस सुरू झाले. मुंबई-उपनगरात मान्सूनची हजेरी, कांदिवली ते गोरेगाव पावसाची जोरदार बॅटिंग बघायला मिळत आहे. मुंबईकरांची प्रतीक्षा संपली. अखेर मान्सूनने मुंबईसह उपनगरात हजेरी लावली आहे. कांदिवली, मालाड, बोरिवली, गोरेगावसह सर्वच भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. कांदिवली, मालाड, बोरिवली, गोरेगाव परिसरात पाऊस सुरू आहे.  मान्सूनच्या आगमनाने मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाची हजेरी 

मुंबईत आज सकाळपासूनच हवामानात बदल झाला. दादर आणि आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण सुरूवातीला बघायला मिळाले. त्यानंतर मुसळधार पावसाला सुरूवात झाली. अनेकजण स्टेशनवरच अडकली. वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पहिल्या दमदार सरींमुळे वातावरणात छान गारवा निर्माण झाला आहे. अखेर मुंबईकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. पुढील तीन ते चार तास मुंबईसह उपनगरांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. यादरम्यान 30-40 ताशी वेगाने वारे असेल.

भारतीय हवामान विभागाने दिला मोठा इशारा 

जळगावात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली. तब्बल एक ते दीड तासापर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला. जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. अद्याप देखील पेरणी योग्य पावसासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

सरकारकडून शेतकऱ्यांना करण्यात आले आवाहन 

सरकारकडून अगोदरच शेतकऱ्यांना सांगण्यात आले की, जोपर्यंत आवाहन केले जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करणे टाळावे. दमदार पावसानंतरच पेरण्या कराव्यात. यंदा राज्यात पाऊस कमी राहण्याचा इशारा अगोदरच देण्यात आला. एल निनोचा प्रभाव या पावसावर असणार आहे. जगभरात तज्ज्ञांनी एल निनोचा इशारा दिला. एल निनो प्रशांत महासागरात सक्रिय देखील झाला. त्याचा परिणाम राज्यातील पावसावर होण्याचा अंदाज आहे.

Follow Us
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह