AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : रोहितला चांगलं खेळण्याची प्रेरणा कुणाकडून मिळाली? हिटमॅन म्हणाला..

Rohit Sharma On Gully Cricket : एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी 14 मार्च रोजी टी 20I मुंबई लीग स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा करण्यात आली. यावेळेस रोहित शर्मा याने गल्ली क्रिकेटवर बोलताना आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Rohit Sharma : रोहितला चांगलं खेळण्याची प्रेरणा कुणाकडून मिळाली? हिटमॅन म्हणाला..
Rohit Sharma On Gully CricketImage Credit source: t20mumbai
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 14, 2026 | 10:17 PM
Share

मुंबईने भारताला आणि क्रिकेट विश्वाला एकसेएक आणि तोडीसतोड क्रिकेटपटू दिले. मुंबईने क्रिकेटला सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, संजय मांजरेकर, विनोद कांबळी आणि यासारखे अनेक स्टार खेळाडू दिले. त्यामुळेच मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हणतात. आताच्या काळात या दिग्गज मुंबईकर खेळाडूंचा वारसा रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, शम्स मुलानी, सर्फराज खान, मुशीर खान, तुषार देशपांडे, अर्थव अंकोलेकर, सिद्धेश लाड, आयुष म्हात्रे या आणि यासारखे अनेक खेळाडू पुढे नेत आहेत. हे खेळाडू अनेकदा मुंबईत गल्ली क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे प्रत्येक मुंबईकर खेळाडूच्या नसानसात गल्ली क्रिकेट आहे. सचिनने तर गल्ली क्रिकेटमुळे आपण स्ट्रेट ड्राईव्ह अचूकपणे मारू शकलो, असं म्हटलं होतं. अशात आता रोहित शर्मा यानेही गल्ली क्रिकेटबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित काय म्हणाला?

“माझ्यासाठी गल्ली क्रिकेट खेळणं हे महत्वाचे होतं. शाळेतून घरी आल्यानंतर संध्याकाळी 2 तास गल्ली क्रिकेट खेळायला मिळायचं. त्यानंतर थोडंसा अभ्यास करावा लागायचा. गल्ली क्रिकेटमध्ये कोणी ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड नव्हतं. पण आपला मित्र चांगला खेळला तर वाटायचं आपण का नाही तसं खेळु शकत? तेव्हापासून चांगल खेळायची ऊर्जा निर्माण झाली. त्यानंतर शाळेत क्लबमध्ये जॉईन होऊन क्रिकेट खेळायला सुरुवात केली”, असं रोहितने म्हटलं. मुंबईत टी 20I मुंबई लीग स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा करण्यात आली. यावेळेस रोहितने गल्ली क्रिकेटबाबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला.

रोहितने सांगितला मजेशीर किस्सा

रोहितने या कार्यक्रमात बोलताना गल्ली क्रिकेटमधील गंमतीचा उल्लेख करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. “गल्ली क्रिकेटमध्ये ज्याने काच फोडली त्यानेच नुकसान भरपाई देणं योग्य नाही”,असं रोहितने म्हटलं.

“सामना जिंकण्यासाठी काहीही करा, असं कॅप्टनने सांगितलेलं असतं. मग काच फोडली तर सर्व टीमने भरपाई दिली पाहिजे. टीमने भरपाई दिली नाहीतर ज्याच्या वडिलांकडे जास्त पैसे त्यांनी दिले पाहिजे”, असंही रोहितने म्हटलं.

रोहितची प्रथम श्रेणी कारकीर्द

दरम्यान रोहित देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतो. रोहितने आतापर्यंत 129 फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 129 सामन्यांमधील 209 डावांत एकूण 9 हजार 318 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान नाबाद 309 धावांची खेळी केली होती. रोहितने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 29 शतकं आणि 38 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच रोहितने 24 विकेट्सही मिळवल्या आहेत.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल