AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 Mumbai League : स्पर्धेच्या चौथ्या मोसमाची घोषणा, हिटमॅन रोहितचा खेळाडूंना कानमंत्र, काय म्हणाला?

T20 Mumbai League 2026 : एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनद्वारे टी 20 मुंबई लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमाची घोषणा करण्यात आली. यावेळेस एमसीए पदाधिकारी उपस्थित होते.

T20 Mumbai League : स्पर्धेच्या चौथ्या मोसमाची घोषणा, हिटमॅन रोहितचा खेळाडूंना कानमंत्र, काय म्हणाला?
Rohit Sharma and T20 Mumbai LeagueImage Credit source: t20mumbai
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 14, 2026 | 9:34 PM
Share

क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 19 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. या 19 व्या मोसमातील पहिल्या टप्प्याला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात एकूण 10 संघांमध्ये 16 दिवस 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. क्रिकेट चाहत्यांमध्ये या पर्वासाठी उत्सूकता पाहायला मिळत आहे. अशात आता मुंबई क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएकडून बहुप्रतिक्षित T20 मुंबई लीगच्या चौथ्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेतील चौथ्या पर्वाच्या घोषणेवेळेस टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा, एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड आणि आशिष शेलार हे उपस्थित होते. या दरम्यान रोहित शर्मा याने टीम इंडियाच्या कामगिरीचं कौतुक केलं. सोबतच खेळाडूंनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन संधी सोनं करावं, असं रोहितने म्हटलं.तसेच रोहितने आपल्या क्रिकेटबाबतच्या काही आठवणींना उजाळा दिला.

“टीम इंडियाच्या कामगिरीचा अभिमान”

मेहनतच टीम इंडियाच्या यशाचं मुख्य कारण आहे. खेळाडू मेहनत घेतायत त्यामुळेच भारतीय संघ यशस्वी ठरतोय. भारतीय संघाची कामगिरी ज्या पद्धतीने सुरु आहे, तसेच महिला क्रिकेटपटू कामगिरी करत आहेत ते पाहून त्यांचा अभिमान आहे”, असं रोहितने म्हटलं. तसेच “भारतीय महिला आणि पुरुष संघाला जे यश मिळतंय ते असंच सुरु राहिल”, असा विश्वास रोहितने यावेळेस व्यक्त केला.

“वयापेक्षा मेहनत महत्त्वाची”

रोहितने खेळात वयापेक्षा मेहनत महत्त्वाची असल्याचं म्हटलं. “खेळात वय महत्वाचं नसून मेहनत महत्वाची आहे. मुंबईकर खेळाडू कठोर मेहनत घेतात, म्हणून त्यांना यश मिळतं”, असं रोहितने स्पष्टपणे म्हटलं.

एमसीए आणि ग्राउंड स्टाफला सर्व श्रेय

आयपीएल आणि मुंबई लीग या स्पर्धामुळे खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. त्यामुळे खेळाडू तयार होत आहेत. नवीन दमाचे खेळाडू तयार होण्याचं श्रेय हे एमसीए आणि ग्राउंड स्टाफच आहे” असं म्हणत रोहितने एमसीए आणि ग्राउंड स्टाफलाही श्रेय दिलं.

“खेळाडूंनी संधी सोडू नये”

“मुंबई लीग स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना संधी मिळतेय. खेळाडूंनी ही संधी दवडू नये. यंदा 3 नवे संघ या स्पर्धेत सामील होत आहेत. तसेच महिलांच्या 3 नव्या टीम्स आल्या आहेत. त्यामुळे यंदा या स्पर्धेत चांगली चुरस पाहायला मिळेल”, अशी आशा रोहितने या वेळेस व्यक्त केली.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल