कठडा तोडून स्विफ्ट डिझायर इंद्रायणी नदीत बुडाली, तीनपैकी एक मित्र पोहून आला

| Updated on: Aug 02, 2019 | 8:11 AM

मावळ तालुक्यातील टाकवे ब्रिजवरून इंद्रायणी नदीमध्ये बुडालेली स्विफ्ट डिझायर कार NDRF आणि शिवदुर्ग ट्रेकर टीमने नदीतून बाहेर काढली.

कठडा तोडून स्विफ्ट डिझायर इंद्रायणी नदीत बुडाली, तीनपैकी एक मित्र पोहून आला
Follow us on

पुणे : मावळ तालुक्यातील टाकवे ब्रिजवरून इंद्रायणी नदीमध्ये बुडालेली स्विफ्ट डिझायर कार NDRF आणि शिवदुर्ग ट्रेकर टीमने नदीतून बाहेर काढली. या गाडीमध्ये असलेले संकेत नंदू असवले रा. टाकवे यांचा मृतदेह आढळला आहे. तर अक्षय जगतापचा अद्यापही  शोध सुरु आहे.

मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक पुलाचा कठडा तोडून कार इंद्रायणी नदीच्या पाण्यात कोसळली होती. काल दुपारी ही दुर्घटना घडली. या अपघातानंतर एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. या पथकाने शोध घेत कार बाहेर काढली.

टाकवे जवळील इंद्रायणी पुलावरून स्विप्ट डिझायर कार पुलाचा कठडा तोडून इंद्रायणी नदीच्या पाण्यात पडली होती. संकेत असवले कार चालवत होता. तर  त्याच्यासोबत अक्षय ढगे, अक्षय जगताप हे दोघे  होते. दुपारी या कारला अपघात झाला आणि ती थेट पुलावरुन नदीत कोसळली. अक्षय ढगेला पोहता येत असल्याने तो पोहत बाहेर आला. मात्र दोघांचा पत्ता लागत नव्हता. शोधपथकाने गाडी बाहेर काढली तेव्हा संकेतचा मृतदेह आढळला. पण अक्षय जगतापचा शोध अद्याप सुरु आहे.