#MeToo : मला ‘वन नाईट स्टँड’ची ऑफर दिली होती : श्रुती मराठे

| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

मुंबई : #MeToo मोहिमे अंतर्गत आतापर्यंत अनेक लैंगिक शोषणाच्या घटना समोर आल्या आहेत. या मोहिमेमुळे अनेक अभिनेत्रिंनी लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवला. या मोहिमेमुळे बॉलिवूड, हॉलिवूड, टेलिव्हिजन, मीडिया क्षेत्रातील अनेक धक्कादायक अशा लैंगिक शोषणाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. आता मराठी अभिनेत्री श्रुती मराठेने सुद्धा ‘ह्यूमन ऑफ बॉम्बे’च्या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट लिहिली. यामध्ये श्रुतीने आपल्यासोबत झालेल्या […]

#MeToo : मला वन नाईट स्टँडची ऑफर दिली होती : श्रुती मराठे
Follow us on

मुंबई : #MeToo मोहिमे अंतर्गत आतापर्यंत अनेक लैंगिक शोषणाच्या घटना समोर आल्या आहेत. या मोहिमेमुळे अनेक अभिनेत्रिंनी लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवला. या मोहिमेमुळे बॉलिवूड, हॉलिवूड, टेलिव्हिजन, मीडिया क्षेत्रातील अनेक धक्कादायक अशा लैंगिक शोषणाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. आता मराठी अभिनेत्री श्रुती मराठेने सुद्धा ‘ह्यूमन ऑफ बॉम्बे’च्या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट लिहिली. यामध्ये श्रुतीने आपल्यासोबत झालेल्या लैगिंक शोषणाबद्दलचा धक्कादायक असा खुलासा केला आहे.

मी एका चित्रपटाच्या मुख्य भूमिकेच्या ऑडिशनला गेले होते. तेव्हा तिथे मला कास्टिंग काऊचचा अनुभव आला. निर्मात्याकडून मला थेट वन नाईट स्टँडची ऑफर करण्यात आली होती. मुलाखतीमध्ये निर्मात्यांनी प्रोफेशनली बोलताना वन नाईट स्टँड अशा शब्दांचा वापर केला, असं श्रुतीने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

श्रुती म्हणाली, मला माहित होते कास्टिंग काऊचसारख्या प्रकारासाठी मी कधी तयार होणार नाही आणि मी या सर्व गोष्टींसाठी निर्मात्यांना नकारही दिला. पण नकार दिल्यानंतर निर्मात्यांना एक प्रश्न विचारला, तुम्हाला वाटते का मी तुमच्यासोबत वन नाईट स्टँड करावा, मग तुम्ही कोणत्या अभिनेत्यासोबतही असं कराल का?, असा प्रश्न विचारताच निर्माते हैराण झाले होते.

श्रुती मराठेने 2008 मध्ये ‘सनई चौघडे’ या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. याशिवाय श्रुतीने ‘तप्तपदी’, ‘रमा माधव’ आणि ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’मध्येही श्रुतीने काम केलं आहे. तसेच ‘बुधिया सिंह’ आणि ‘वेडिंग अॅनिव्हर्सरी’सारख्या हिंदी चित्रपटातही तिने काम केलं आहे.