AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिरा भाईंदरमध्ये दीड वर्षाचा मुलगा कोरोनामुक्त, एका दिवसात 15 जणांना डिस्चार्ज

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मिरा भाईंदरला मात्र (Mira Bhayandar Corona Patient Discharge) दिलासा मिळाला आहे.

मिरा भाईंदरमध्ये दीड वर्षाचा मुलगा कोरोनामुक्त, एका दिवसात 15 जणांना डिस्चार्ज
| Updated on: Apr 28, 2020 | 8:13 AM
Share

ठाणे : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मिरा भाईंदरला मात्र (Mira Bhayandar Corona Patient Discharge) दिलासा मिळाला आ राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मिरा भाईंदरला मात्र (M ira Bhayandar Corona Patient Discharge) दिलासा मिळाला आहे. हे. मिरा भाईंदरमध्ये काल (27 एप्रिल) संध्याकाळी जवळपास 15 रुग्ण कोरोनामुक्त झाले. या सर्वांना काल संध्याकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान आतापर्यंत मिरा भाईंदर मध्ये 41 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.

मिरा भाईंदरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Mira Bhayandar Corona Patient Discharge) आहे. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत होते. मात्र काल रुग्णालयातून एका वेळी तब्बल 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यात दीड वर्षाच्या मुलापासून ते 60 हून अधिक वय असलेल्यांचाही समावेश आहे. काल बरे झालेल्या पाच वयोवृद्धांसह दोन लहान मुलांचा समावेश आहे. वयोवृद्ध लोकांमधील सर्वांचे वय हे 60 वर्षाहून अधिक आहे. या सर्वांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे.

मिरा भाईंदर रुग्णांचा आकडा 145 वर पोहचला आहे. तर आतापर्यंत 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 102 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मिरा भाईंदर मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी 19 एप्रिल ते 23 एप्रिलपर्यंत संपूर्णतः बंद केले होते. यानंतर पुढे 28 एप्रिलपर्यंत हा बंद वाढवला होता. पण तरीही मिरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे.

मिरा भाईंदरमध्ये गेल्या 11 दिवसात 93 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा हा 145 वर पोहोचला आहे. त्यामुळे 28 एप्रिलनंतर यात काही सूट मिळणार की पुन्हा मीरा -भाईंदर संपूर्ण लॉकडाऊन करणार यासकडे सर्वांचे लक्ष लागलं (Mira Bhayandar Corona Patient Discharge) आहे.

संबंधित बातम्या : 

Yavatmal Corona Update : काल 27, आज 19, यवतमाळमध्ये तीन दिवसात 55 रुग्ण, बाधितांची संख्या 79 वर

Jalgaon corona update : जळगावात कोरोनाचा पाचवा बळी, जिल्ह्यात आतापर्यंत 18 कोरोनाबाधित

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...