Jalgaon corona update : जळगावात कोरोनाचा पाचवा बळी, जिल्ह्यात आतापर्यंत 18 कोरोनाबाधित

जिल्ह्यात कोरोनामुळे पाचवा बळी गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली (Corona patient death jalgaon) आहे.

Jalgaon corona update : जळगावात कोरोनाचा पाचवा बळी, जिल्ह्यात आतापर्यंत 18 कोरोनाबाधित

जळगाव : जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली (Corona patient death jalgaon) आहे. जिल्ह्यात यापूर्वी कोरोनामुळे चार जणांचा बळी गेला आहे. अंमळनेर शहरातील एका 66 वर्षीय कोरोनाबाधित वृद्धावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. काल (26 एप्रिल) रात्री उशिरा या वृद्धाची उपचारादरम्यान प्रकृती खलावल्याने मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली (Corona patient death jalgaon) आहे.

अंमळनेर येथील शाहआलम नगरातील एका कोरोनाबाधित 66 वर्षीय वृद्धाचा काल रात्री 11 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या वृद्धाला 24 एप्रिलला कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अंमळनेरमधील शाहआलम नगरातील हा दुसरा तर अंमळनेर शहरातील कोरोनाचा हा चौथा बळी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने 5 बळी गेले आहेत. दरम्यान, अंमळनेर येथील मृत वृद्धाला हृदयविकाराचा आजार होता. तसेच त्यांचे वजनही वाढले होते. उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने वृद्धाचा अखेर मृत्यू झाला.

कोरोनाचे जिल्ह्यातील ‘हॉटस्पॉट’ शहर असलेल्या अंमळनेरात कोरोनामुळे आतापर्यंत 4 बळी गेले आहेत. तर एक बळी जळगाव शहरातील आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 18 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी अंमळनेरातील 13 रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात 18 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 1 रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे. तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असेही डॉ. खैरे यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत 8 हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1188 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण 342 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

जळगावात फेसबुक लाईव्हवर लग्न, नवदाम्पत्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 हजार

Lockdown | अन्नदान करुन परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला, रिक्षा उलटून दोघांचा जागीच मृत्यू

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *