महाराष्ट्रात 522 नवे कोरोना रुग्ण, एकूण आकडा 8 हजार 590 वर

महाराष्ट्रात 522 नवे कोरोना रुग्ण, एकूण आकडा 8 हजार 590 वर

महाराष्ट्रात आज (27 एप्रिल) कोरोनाबाधित 522 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 8 हजार 590 वर पोहचली आहे (Total Corona Patient in Maharashtra).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 27, 2020 | 9:59 PM

मुंबई : महाराष्ट्रात आज (27 एप्रिल) कोरोनाबाधित 522 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 8 हजार 590 वर पोहचली आहे (Total Corona Patient in Maharashtra). आज दिवसभरात 94 कोरोना रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात 1282 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच एकूण 6939 रुग्णांवर राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत महाराष्ट्रात 1 लाख 21 हजार 562 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यापैकी 1 लाख 2 हजार 52 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले, तर 8 हजार 590 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 45 हजार 677 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. 9 हजार 399 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 369 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये मुंबईचे 15, अमरावती शहरातील 6, पुणे शहरातील 4 तर जळगाव येथील 1 आणि औरंगाबाद शहरातील 1 आहे. अमरावती शहरात झालेले मृत्यू हे 20 ते 25 एप्रिल 2020 या कालावधीतील आहेत.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 15 पुरुष तर 12 महिला आहेत. 27 मृत्यूंपैकी 13 रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील आहेत, तर 8 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 6 रुग्ण 40 वर्षांखालील आहेत. या 27 रुग्णांपैकी 22 जणांमध्ये (81 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यातील एकाला एच आय व्ही आणि आणखी एका रुग्णाला कर्करोग होता.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 572 कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. या ठिकाणी आज एकूण 7 हजार 861 सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी 32.28 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले.

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकेडवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

निराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना 3 महिन्यांचं आगाऊ अनुदान, अजित पवारांच्या निर्देशानंतर 1 हजार 273 कोटी वितरीत

मुंबईत कोरोनामुळे आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू, 3 दिवसात 3 पोलिसांच्या मृत्यूने खळबळ

3 मेनंतर लॉकडाऊन काढणार का? गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात…

देशभरात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 22.17 टक्क्यांवर, 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवा रुग्ण नाही

Total Corona Patient in Maharashtra

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें